अनोळखी इसमाने जबरदस्तीने महिलेचे दागिने हिस्कावले
खुटसावरी येथील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल
कालिदास खोब्रागडे, लाखनी :- मोटारसायकलने लिफ्ट दिलेल्या महिलेस अनोळखी इसमाने गावाबाहेर नेऊन हातात दगड घेऊन अश्लील शिवीगाळ करून जबरीने गळ्यातील सोन्याचे दागिन्यासह मोबाईल व नगदी १०० रुपये असा एकूण १७ हजार १०० रुपयाचा मुद्देमाल जबरीने हिस्कावल्याची घटना खुटसावरी बौद्ध विहाराजवळ रविवारी(ता.२८) चे दुपारी ४:३० वाजता दरम्यान घडली. पिडीत महिलेचे फिर्यादी वरून लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. वृत्त लिही पर्यंत अज्ञात अनोळखी इसमाचा शोध लागला नव्हता.
पिडीत महिला खुटसावरी येथील रहिवासी असून लाखनी येथील एका डॉक्टर कुटुंबाकडे धूनी भांडी चे काम करते. तथा दररोज ऑटो ने जाणे येणे करून खुटसावरी फाट्यावरून पायी तर केव्हा केव्हा दुचाकी चालकांना लिफ्ट मागून गावी जात असते. रविवारी सायंकाळी ४:०० वाजता दरम्यान पिडीत महिला आपली कामे आटोपून लाखनी वरून खुटसावरी फाटा(धारा हॉटेल) येथे आली व तिथून खुटसावरी कडे कोणी जाते का. याची वाट पाहत उभी असताना एक इसम मोटरसायकलने डावी बाजूस(खुटसावरी) कडे वळण घेत असताना त्याला आवाज देऊन थांबविले व खुटसावरी येथे सोडून दे असे म्हटल्यावर त्याने होकार दिल्याने ती मोटारसायकल वर पाठीमागे बसली. थोडे अंतर गेल्यावर सदर इसमाने त्याची मोटारसायकल बौद्ध विहाराकडे डावे वळण घेतल्याने पिडीत महिला घाबरून चालत्या मोटरसायकल वरून उडी मारली व बौद्ध विहाराचे दिशेने पळाल्याने त्यांने मोटारसायकलने पाठलाग करून एका झाडाजवळ पिडितेला अडविले व मोटारसायकल वरून खाली उतरून जमिनीवर पडलेला दगड हातात उचलून अश्लील शिवीगाळ केली. तथा सामान दे नाही तर तुला मारून टाकीन अशी धमकी देऊन त्याने पिडितेच्या गळ्यातील २ ग्राम सोन्याचे १४ मण्याची काळी पोत तोडून २ तुकडे करून जमिनीवर ठेवले. त्यानंतर नाकातील खळा काढला, खळ्यातील ३ घांगऱ्या काढल्या. तसेच पिडीतेजवळील थैली घेऊन महामार्ग क्रमांक ५३ च्या दिशेने पळून गेला. थैलीत मोबाईल नगदी १०० रुपये, चष्मा व २ चाब्या असा एकूण १७ हजार १०० रुपयाचा मुद्देमाल घेऊन पळून गेला. त्यानंतर पिडीता धारा हॉटेल येथे आली व मुलास बोलावून मोटारसायकल ने आजूबाजूचे परिसरात शोध घेतला. पण मिळून आला नाही. त्यामुळे मुलासह लाखनी पोलिस ठाणे गाठून कर्तव्यावरील पोलिस अधिकाऱ्यास आपबिती सांगितली घटनेचे गांभीर्य ओळखून लाखनी पोलिसांनी अज्ञात इसमा विरुद्ध अपराध क्रमांक १७२/२०२४ कलम ३९२, ५०६ भादवि अन्वये गुन्हा दाखल करून घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंग, एलसीबी चे पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर, पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक देविदास बागडे, पोलिस हवालदार सुभाष राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन निरीक्षण केले तथा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाबाबद काही मार्गदर्शक सूचना केल्या. घटनास्थळाचे आजूबाजूचे सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले. पण अज्ञात इसमाचा वृत्त लिही पर्यंत सुगावा लागला नव्हता. पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक देविदास बागडे, पोलिस शिपाई पंकज निरगुळे तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

