आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती कार्यक्रम संम्पन्न

महत्वाची बातमी
Share


आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 115 वी जयंतीला अनुसरून प्राध्यापक हेमंत वरघणे समाजकार्य प्रात्यक्षिक संचालक कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दिवाकर कुंमरे अतिथी डॉक्टर सुरेश मिलमिले अतिथी मान्यवरांनी राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचे पूजन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर चंद्रभान खंगार यांनी राष्ट्रसंतांच्या विचारावर प्रास्ताविकेत माहिती देताना राष्ट्रसंतांची जयंती ही ग्राम जयंती म्हणून साजरी करावी असे मत मांडले. कार्यक्रमाचे अतिथी डॉक्टर दिवाकर कुमरे यांनी राष्ट्रसंतांच्या साहित्याचा अभ्यास करावा व योग प्राणायाम विद्यार्थ्यांनी जीवनात अंगी करावे असे मत मांडले. कार्यक्रमाचे अतिथी डॉक्टर सुरेश मिलमिले यांनी ग्रामगीता जीवन विकास परीक्षा अंतर्गत होणाऱ्या परीक्षा विद्यार्थ्यांनी द्याव्या असे मत मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक हेमंत वरघणे यांनी राष्ट्रसंतांची कार्य महान आहे व त्यांना भारतरत्न मिळावा असे मत मांडले. कार्यक्रमाचे आभार कुमारी दीक्षा वनकर यांनी केले. या प्रसंगी एम एस डब्ल्यू सेमिस्टर 4 चे सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत