भालगाव सोसायटीच्या चेअरमनपदी भारती मराठे यांची बिनविरोध नवड.

महाराष्ट्र
Share

भालगाव सोसायटीच्या चेअरमनपदी भारती मराठे यांची बिनविरोध निवड.

एरंडोल : तालुक्यातील भालगाव विविध
कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भारती बाळू मराठे यांची तर व्हाईस चेअरमनपदी करमसिंग धरमसिंग पारधी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या वेळी संचालक देविदास मराठे, श्रीराम मराठे, सुभाष पाटील, भास्कर मराठे, गुलाब मराठे, नामदेव पाटील, नारायण मराठे, संजय मराठे, महारु पाटील, कल्पनाबाई मराठे आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजित पाटील यांनी कामकाज पाहिले. संस्थेचे सचिव विलास जगताप, शिपाई नथ्थू पाटील यांनी त्यांना निवडणुकीसाठी मदत केली. दरम्यान, धरणगाव बाजार समितीचे माजी उपसभापती देविदास मराठे, माजी जि.प. सदस्य कैलास चव्हाण, सरपंच गोविंदा पाटील, पोलिस पाटील राहुल मराठे, किशोर पाटील, अनिल मराठे यांनी
नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा सत्कार केला. तर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी भ्रमणध्वनीवरुन नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र देसले, मा. विधानसभा क्षेत्रप्रमुख पराग पवार व राष्ट्रवादीच्या तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत