कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या खड्डेमय रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार कोण
विनोद काळकोपरे :- कल्याण तालुका प्रतिनिधी
कल्याण डोंबिवली महानगरपालिका रस्त्यांची दुरावस्था होण्याला जबाबदार कोण वेळेवर टॅक्स भरणारे नागरिक की कल्याण डोंबिवली महानगरपालिका मधील वातानुकूलित दालनात बसून आदेश देणारे अधिकारी .
वर्षाला दोन वेळा टॅक्स भरून व्याज ही सावकारी असताना ही जागृत नागरिक टॅक्स भरत आहे . परंतु त्यांना सुविधा मात्र शून्य रस्ते धड नाही की चालायला फुटपाथ नाहीत की पियाला स्वच्छ पाणी नाही महानगरपालिका मधील शिक्षण दर्जा सुधारत नाही आहे मग नागरिकांनी टॅक्स भरायला पाहिजे का ?
कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ श्रीकांतजी शिंदे यांनी ३५० कोटी रस्ते विकास कामांसाठी दिले त्यातील काही रस्ते झालेत तर काही अर्धवट आहेत तर काही ठिकाणी लोकप्रतिनिधी व त्यांच्या नातेवाईक यांनी रस्ता अडवून महानगरपालिका स वेठीस धरले आहे . तिकडे मुख्यमंत्री साहेब यांनी ठाण्यात क्लस्टर योजना राबवित झोपडपट्टी व चाळींच्या विकासाचा मार्ग मोकळा केला तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये क्लस्टर योजना बारगळली दिसतेय नवीन नवीन जोशात अधिकारी घरोघरी सर्व्हे करताना दिसत होते आता ते मिस्टर इंडिया सारखे दिसेनासे झालेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत लाखो ने झोपडपट्टी आहे व ते महानगरपालिका अस्तित्वात येण्याआधीपासून टॅक्स भरत आहे तरीसुद्धा त्यांच्या माथी अनधिकृत स्टँप चा शिक्का मारला गेलाय तो आजपर्यंत कोणीही पुसण्याचा प्रयत्न केला नाही आहे . महाराष्ट्र चे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांनी येत्या विधिमंडळात कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील चाळींच्या माथी असणारा अनधिकृत स्टँप चा शिक्का रद्द करन्यासाठी प्रयत्न करावा व नागरिकांना या अनधिकृत स्टँप च्या जाचक त्रासापासून मुक्त करावे . तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त यांनी जो ठेकेदार रस्ता बनवतोय त्याला त्या रस्त्याचे कंत्राट दिले आहे त्यांच्या नावाचा बोर्ड व तो रस्ता किती वर्षे टिकेल यांचे संपूर्ण विवरण सह बोर्ड वर त्या ठेकेदार यांचा मोबाईल क्रमांक असणे अनिवार्य करावे जेणेकरून रस्त्याबाबत काही तक्रार असली की दिवस रात्र कधी नागरिक त्यांना संपर्क करू शकतो व रस्त्याबाबत विचारणा करू शकेल. संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिका रस्ते खड्डेमय झाली आहे . सर्वच प्रभाग क्षेत्रात हीच परिस्थिती आहे . मुख्यमंत्री यांच्या आदेशानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी अनधिकृत ढाबे ,बार , यांच्यावर कडक करवाई करण्याचे आदेश ही दिले परंतु प्रत्येक प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त यांनी काही ठिकाणी आयुक्तांना खुश करण्यासाठी काही बार ,ढाबे जमीनदोस्त केले तर काही ढाबे ,बार मालकांना खुश करणयासाठी सहाय्यक आयुक्त यांचे हात थरथरत आहेत किव्वा कारवाई न करण्याचा नावाखाली देण्याघेण्याचे ठरत असल्याचे शक्यता नाकारता येत नाही

