
ग्रामपंचायत खेडमकता येथिल सरपंच /सचिव यानी मासिक सभा दिनांक 22/07/2024 रोजी चे काढ़लेले नोटिस विषय क्र.5 नुसार ग्रामपंचायत खेडमकता येथे दोन ग्रामपंचायत कर्मचारी पदभरती मासिक सभेत दिनांक 29/07/2024 ला होनार असल्याने.
परंतु गावातील सुशिक्षित उमेदवाराना या ग्रा. प.कर्मचारी पदभरतीत संधि मिळणार नसल्याने याची दखल घेऊन ही पदभरती पारदर्शक पद्धतीने व्हावी व गावातील सर्व पात्र उमेदवारांना या ग्रा. पं. कर्मचारी पदभरतीत अर्ज करण्यासाठी व निवळ प्रक्रियेत भाग घेण्याची संधि मिळावी म्हणून याची तक्रार दिनांक 25/07/2024 रोजी मा.मुख्य कार्यकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब चंद्रपूर यांना माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या ज्योती मेश्राम यांनी केलेली आहे.

