अशोक नगर वासियांचे नगर पालिकेला निवेदन.
ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील
एरंडोल :येथील अशोक नगर परिसरातील रहिवाशांनी एरंडोल नगर पालिकेला नगरातील रस्त्यांवर सतत होणाऱ्या पावसामुळे चिखलमय झालेले असल्याने तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाकण्यासाठी निवेदन दिले.
निवेदनात शहरात सध्या नगर पालिकेतर्फे नूतन पाईप लाईन चे काम सुरु असल्याने सर्वत्र खोदकाम काम झाले असल्याने रस्ते पूर्णतः खराब झाले आहे व त्यामुळे खड्डे तयार होऊन त्यात पाणी साचत आहे त्यामुळे सर्वत्र चिखल होत असल्याचे म्हटले असुन रहिवाशांना पायी चालणे देखील मुश्किल झाले असल्याचे म्हटले आहे.शाळेच्या बसेस , मोटरसायकल चिखलात रुतून जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.त्यासाठी सदर रस्त्यांवर तात्पुरत्या स्वरूपात मुरुम किंवा कच टाकल्यास रहिवाशांना चालण्या साठी तयार करून द्यावा असे म्हटले आहे.तसेच नगर पालिकेस वारंवार संपर्क करून देखील कुठल्याही स्वरूपाचा प्रतिसाद देण्यात येत नसल्याचे म्हटले असुन सदर बाब गंभीर स्वरूपाची असल्याचे म्हटले आहे.
निवेदनावर भावना लढ्ढा , नंदिनी ठक्कर, हेमलता बिरारी, मनीषा साळी , शोभा धोबी , कल्याणी धोबी, मनीषा पाटील, मनीषा महाजन, नंदिनी पाटील, पुजा महाजन , विजया पाटील, ज्योती बोरसे , भाग्यश्री बिरारी, रोशनी महाजन , शोभा महाजन, आशा बोरसे, जयश्री पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

