सामाजिक वनिकरण कार्यालय मधील झोल झपाट्या साठी बोगस कॉम्पुटर ऑपरेटर कार्यरत?
चंद्रपूर :- सिंदेवाही तालुक्यातील वन परिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनिकरण कार्यालय मध्ये प्रशासन कडून किंवा इतर कुठल्याही प्रकारे नियुक्ती नसलेला एक बोगस कॉम्प्युटर ऑपरेटर वन परिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनिकरण कार्यालय मध्ये कित्येक वर्षांपासून
ठाण मांडून बसला आहे, आणि विशेष म्हणजे या शासकीय कार्यालय मध्ये तो कृषी विभाग सिंदेवाही चे काम करीत असतो,त्या मुळे हा बोगस कॉम्पुटर ऑपरेटर शासकीय कामाच्या झोल झपाट्या साठी नियुक्त करून ठेवला काय अशी चर्चा जनतेत होत आहे,या बोगस कॉम्पुटर ऑपरेटर वर वन परिक्षेत्र अधिकारी ( सा. व ) यांची विशेष मेहरबानी असल्याने दुसऱ्या कोणत्याही शासकीय कार्यालय ची कामे सदर कार्यालय मध्ये करीत असला तरी आपल्याला कोणी जाब विचारणारा नाही असे गृहीत धरले आहे, लोक सेवक कितीही मोठ्या पदावर असला तरी त्यांना जनतेनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यावीच लागणार आहे, बोगस कॉम्प्युटर ऑपरेटर च्या माध्यमातून शासकीय कागदाचे कितीही घोडे नाचवून झोल झपाटा केला आहे या बाबत जागरूक नागरिकांनी प्रश्न विचारणे गरजेचे आहे, इथे सुशिक्षित बेरोजगार ना रोजगार नाही आणि असे बोगस कॉम्पुटर ऑपरेटर प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मेहरबानी ने दोन कार्यलयामधून स्वतःची झोळी भरून घेत आहे.. ( क्रमश )

