गंगाखेड विधानसभा मतदार संघात बि एल ओ ने आज 18 नोव्हेंबर पर्यंत अजूनही पोल-चिट्या मतदारास वाटप केल्या नाहीत.
भारत सरकार निवडणूक आयोग..? काय कार्यवाही करणार.
गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब जंगले
विधानसभा निवडणूक प्रक्रिया सगळीकडे सुरू असताना गंगाखेड तहसील अंतर्गत निवडणूक निर्वाचन अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकार यांनी विचारलेल्या बी एल ओ यांच्या प्रश्नावर बी.एल.ओ.यांनी पोल-चिट्या वाटप नाही झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल.असे पत्रकार परिषद सांगूनही 18 नोव्हेंबर पर्यंत बी एल ओ यांनी पोल-चिठ्ठ्या मतदारास दिली नसल्याचे मतदारांनी नाराज होऊन सांगितले.
प्रत्येक निवडणुकीत मतदार यादी मध्ये बदल होत असताना मतदाराचे नाव आहे की नाही..? किती क्रमांकावर मतदाराचे नाव आहे..? मतदाराचा बूथ क्रमांक,खोली क्रमांक या सर्व बाबी प्राधान्याने बदलत असतात.मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे मतदान करत असताना अडचणी येणार नाहीत याची खबरदारी वरील सर्व बाबी पोल- चिठ्ठ्या मध्ये असताना प्रत्येक परिसरात नेमून दिलेले बी एल ओ मुद्दामहून पोल-चिठ्ठ्या वाटप करत नसल्याची दिसून येत आहे.सामान्य मतदारा जवळ मतदान करत असताना अडचणी होत असतील तर सामान्य माणूस परेशान होऊन मतदान करत नाही.पोलचिठ्ठ्या राजकीय कार्यकर्ते वाटप करतात त्यामुळे बी एल ओ वाटप करत नसण्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.गंगाखेड विधानसभा पत्रकार परिषदेतील कडक कारवाई करणार म्हणजे काय..? हे निवडणूक आयोग सांगणार का..? असे मात्र सर्वसामान्य मतदारांना वाटते.

चौकट क्रमांक
एका मतदारांनी बीएलओ ना पोल-चिठ्ठ्या विषयी विचारले,आमच्या मार्फत पोल- चिठ्ठ्या वाटपाचे विसरले आहेत त्यामुळे तुम्ही उद्या तुम्ही मतदान करता त्या बुथवर या तुम्हाला पोल-चिट्या तुमच्या हातात दिल्या जातील.असे उद्धट उत्तर देऊन वेळ मारून नेली यावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष आहे

