शासकीय कामात दिरंगाई केल्यामुळे लिपिक यांच्या सेवा पुस्तकात नोंद करण्याचे आदेश .
एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील प्रतिनिधी – एरंडोल: येथील माहिती अधिकार कार्यकर्त्याने मागितलेल्या माहितीनुसार सामाजिक वनीकरण विभाग जळगाव यांनी आपल्या कामात दिरंगाई केल्यामुळे त्यांच्या सेवा पुस्तकात सक्त ताकीद नोंद करण्याचे आदेश उपवनसंरक्षक जळगाव वन विभाग यांनी दिले आहेत
याबाबत सविस्तर वृत्त असे की एरंडोल येथील माहिती अधिकार कार्यकर्ते राजधार संतोष महाजन यांनी सामाजिक वनीकरण विभागीय एरंडोल यांच्याकडे माहिती मागितली असता सदर माहिती त्यांना न मिळाल्याने त्यांनी प्रथम अपील सामाजिक वनीकरण विभाग जळगाव यांच्याकडे दाखल केले परंतु प्रथम अपिलीय अधिकारी यांनी सुनावणी न घेतल्यामुळे द्वितीय अपिल राज्य माहिती आयोग नाशिक यांच्याकडे दाखल केले असता त्यांनी आदेश पारित करून प्रथम अपिलीय अधिकारी एस. वाय. शेख यांच्यावर शासन परिपत्रकाप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये अशा आदेश दिले असता एस.वाय. शेख यांनी उपरोक्त प्रकरणी स्वय:म स्पष्ट खुलासा सात दिवसाच्या आत द्यावा असे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशी अंती आपल्या विभागातील लिपिक नितीन रघुनाथ पाटील यांनी सदर प्रकरण समोर न ठेवल्यामुळे लिपिक नितीन पाटील यांच्यावर ठपका ठेवून यांनी शिस्तभंगाची कारवाई केल्याचे निदर्शनास आल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) नियम, १९७९ मधील कलम १० अन्वये शिक्षा न देता त्यांना मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण म.रा. पुणे अन्वये राज्य माहिती आयोग नाशिक खंडपीठ यांनी पारित केलेले आदेशान्वये त्यांच्या फक्त सेवा पुस्तिकीय ताकीद देण्यात येत आहे असे आदेश शिस्तभंग विषयक प्राधिकारी तथा विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग जळगाव सं.वि. पाटील यांनी दिले आहे.

