एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील
महामार्ग तसेच राज्य महामार्ग रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास!
एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील
एरंडोल: येथे रविवारचा आठवडे बाजार सुमारे तीन वर्षापासून महामार्गाच्या कडेला व राज्य महामार्गाच्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला भरत होता त्यामुळे अनेक अपघात झाले याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या परंतु उपयोग होत नव्हता एरंडोल येथे नुकतेच बदलून आलेले पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्याकडे सुद्धा अनेक तक्रारी आल्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी लहान व्यापाऱ्यांची , शेतकऱ्यांची बैठक घेऊन व्यापाऱ्यांचे मन परिवर्तन करून आठ दिवसापासून शहरात रिक्षा फिरून लहान व्यापारी शेतकरी व भाजीपाला विक्रेते यांना रस्त्याच्या कडेला बसून देता आंबेकर पुतळा कॉम्प्लेक्स रा.ती. काबरे विद्यालयाच्या रस्त्याच्या कडेला तसेच मरी माता रस्ता व नवीन बांधलेल्या आठवडे बाजाराच्या आवारात बसण्यास भाग पाडले हे करीत असताना काही काही भाजीपाला विक्रेत्यांनी त्यास विरोध केला परंतु पीआय गायकवाड यांनी त्यांना चांगल्या प्रकारे समजावून त्यांचे मन परिवर्तन केले त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही कडेला न बसता रा .ती. काबरे विद्यालयाच्या रस्त्याच्या कडेला , आंबेडकर शॉपिंग च्या समोर , मरी माता रस्त्याजवळ तसेच नवीन बांधलेल्या अद्यावत आठवडे बाजाराच्या आवारात बसवण्यास भाग पाडले त्यामुळे महामार्ग व राज्य महामार्ग चे रस्ते मोकळे झाले व वाहतूक सुरळीत झाली त्यामुळे रस्त्यानेच मोकळा श्वास घेतल्याचे बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर असे की एरंडोल येथे ४० ते ५० वर्षापासून अंजनी नदीच्या काठावर न.पा. तर्फे ओटे बांधण्यात आले होते त्या ओट्यावर शेतकरी आपला भाजीपाला विकत होते त्याच बरोबर इतर लहान व्यापारी सुद्धा रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंची लहान लहान दुकाने थाटून विकत होते. परंतु न. पा. ने नवीन आठवडे बाजार करण्याच्या कल्पनेतून या लोकांना जागा सोडण्यास सांगितले त्यानुसार अद्यावत आठवडे बाजार तयार झाले परंतु या आठवडे बाजारात तयार झालेले गाळे जुन्या शेतकऱ्यांना , लहान व्यापाऱ्यांना न देता न.पा. यांनी लिलाव पद्धतीने दिल्याने गरीब शेतकरी आपल्या जागेस मुकावे लागले नगरपालिकेने सुद्धा शेतकऱ्यांना पर्यायी जागेची व्यवस्था केली नाही म्हणून भाजीपाला विक्रेते व इतर लहान व्यापाऱ्यांनी अद्ययावत बांधलेल्या आठवडे बाजारात शेजारीच राज्य महामार्गाच्या दुतर्फी आपले दुकाने थाटली त्यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला अनेक अपघात त्यामुळे झाले अनेक वाद निर्माण झाले याबाबत अनेक तक्रारी झाल्या शेवटी आज पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या प्रयत्नातून यश आले या कामी त्यांनी त्यांना नगरपालिका प्रशासन स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांनी सहकार्य केले कायद्याचा बडगा न दाखवता लोकांचे मन परिवर्तन करून रस्ता मोकळा केल्यामुळे प्रशासनाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार साहेब पो.हे. काॅ. अनिल पाटील , राजेश पाटील , महेंद्र पाटील , संदीप पाटील प्रशांत पाटील , जवान सिंग पाटील , छोटू पैलवान यांनी विशेष परिश्रम घेतले.

