मुंबई टपाल विभागाच्या वतीने मुंबई येथे 15 सप्टेंबर 2025 रोजी 57 व्या टपाल पेन्शन अदालतचे आयोजन
टपाल विभागाचे मुख्य डाकपाल महानिदेशक, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता मुख्य डाकपाल महानिदेशक कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई (पिन कोड 400001) येथे 57 वी टपाल पेन्शन अदालत पार पडणार आहे.
टपाल विभागातून निवृत्त झालेल्या/सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भातील तक्रारी, ज्यांचे मागील तीन महिन्यांत निराकरण झालेले नाही, त्या या पेन्शन अदालत मध्ये विचारात घेतल्या जातील. तसेच महाराष्ट्र व गोवा राज्यातील पेन्शनधारकांच्या तक्रारी यामध्ये समाविष्ट केल्या जातील .
कायदेशीर मुद्दे जसे की वारसा हक्क, वेतनवाढ, शिस्तभंगप्रकरणे, धोरणात्मक विषयांवरील प्रकरणे तसेच डीपीसीच्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणे या सर्व बाबी या अदालतमध्ये विचारात घेतल्या जाणार नाही. त्याचबरोवर पेन्शनधारकांनी आपापल्या तक्रारी स्वतंत्रपणे (एकत्रित किंवा इतरांच्या वतीने नाही) खाली दिलेल्या नमुन्याने वरिष्ठ लेखा अधिकारी/सचिव, पेन्शन अदालत, मुख्य डाकपाल महानिदेशक कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ बिल्डिंग, पहिला मजला, मुंबई – 400001 येथे 19.08.2025 पर्यंत पाठवाव्यात. या तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जांवर विचार केला जाणार नाही.
टपाल पेन्शन अदालत अर्ज प्रपत्र
| क्रमांक | विषय | व्यक्ती/पेन्शनधारकाने भरायची माहिती |
| 1 | पेन्शनधारक / कुटुंब पेन्शनधारकाचे नाव व निवृत्ती/मृत्यूच्या वेळी पदनाम | |
| 2 | निवृत्तीची तारीख व निवृत्त झालेला डाक विभाग | |
| 3 | पीपीओ क्रमांक | |
| 4 | जिथून पेन्शन घेत आहे त्या डाकघराचे नाव | |
| 5 | पेन्शनधारकाचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक | |
| 6 | तक्रारीचा संक्षिप्त आढावा (आवश्यक असल्यास तपशीलवार अर्ज संलग्न करा) | |
| 7 | दिनांक व सही |

