‘सीएसआयआर-नीरी’च्या वतीने रामटेक येथे कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी
शाश्वत स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाच्यादिशेतील एका महत्त्वपूर्ण टप्पा गाठत, सीएसआयआर–राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (सीएसआयआर-नीरी)ने 1000 लिटर प्रतिदिन क्षमतेचा कम्पॅक्ट फिकल स्लज/सेप्टेज सेपरेशन आणि प्रक्रिया (सीएफ़एसएसटी) प्रकल्प रामटेक येथे कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठात (केकेएसयू) तयार केला. या प्रकल्पाची संरचना, विकासकार्य आणि प्रत्यक्ष कार्यान्वयन करण्यात आले आहे. हा उपक्रम सीएसआयआर–फास्ट ट्रॅक कमर्शियलायझेशन (एफटीसी) प्रोजेक्ट च्या ईथ्रीओडब्ल्यू (E3OW) योजने अंतर्गत पूर्ण केलाआहे. या संयंत्राचे उद्घाटन ‘नीरी’चे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन आणि डॉ. संस्कृत विद्यापीठाचे कुलपती अतुल एन. वैद्य यांनी संयुक्तपणे केले.
‘सीएफ़एसएसटी’ हे एक कॉम्पॅक्ट, कमी ऊर्जा वापरणारी, निसर्गावर आधारित तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने गढूळ माती, गाळ, इतर अपशिष्ट घटक (फिकल स्लज) यांचे विकेंद्रीकरण करून, त्यावर प्रक्रिया केली जाते. यासाठी काही विशिष्ट माध्यम घटक आणि झाडे यांच्या सहाय्याने घन–द्रव विभाजन केले जाते. त्यानंतर अपफ्लो एनरोबिक बॅफल्ड रिएक्टर(यूएबीआर), कन्स्ट्रक्टेड वेटलँड,‘अपफ्लो ड्युअल मीडिया फिल्ट्रेशन’ आणि रोगनिर्मूलन (कीटाणुनाशक) द्वारे उपचार केला जातो. या प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय ‘डिस्चार्ज स्टँडर्ड्स’ चे पालन सुनिश्चित होते. प्रक्रिया केलेले पाणी चारा लागवड, बागकाम, फुलोपार्जन, स्वच्छता आणि जलस्रोतांचे पुनर्जनन यासाठी योग्य असते, तर स्थिर केलेल्या घन पदार्थांचा, खालच्या गाळाचा उपयोग शेतीसाठी आणि मातीची समृद्धी करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या खताच्या स्वरूपात करता येतो.
संसाधनांची पुनर्प्राप्ती आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देत, सीएफ़एसएसटी प्रकल्प सतत विकास लक्ष्य 6 (स्वच्छ जल आणि स्वच्छता) आणि सतत विकास लक्ष्य 11 (सतत शहरे आणि समुदाय) यांचे समर्थन करतो. हे तंत्रज्ञान केंद्र सरकारद्वारे सीएसआयआर टेक्नोलॉजी ट्रान्सफर कमिटमेंट्स- 2030 मध्येही समाविष्ट करण्यात आलेली आहेत. यामुळे राष्ट्रीय स्वच्छता मोहिमांमध्ये सीएसआयआर-नीरी च्या योगदानाला बळकटी मिळते . सीएफ़एसएसटी तंत्रज्ञान डॉ. रितेश विजय, अभिषेक बिसार्य, आकाश पटवा आणि सत्येंद्र (सीएसआयआर-नीरी) यांनी विकसित, उन्नत आणि अंमलात आणले आहे.
या कार्यक्रमात सीएसआयआर-नीरी चे वरिष्ठ अधिकारी— राजीव कुमार वर्मा (प्रशासन नियंत्रक), भास्कर रवी (वित्त आणि लेखा नियंत्रक), एस. पी. मेहता (क्रय आणि साठा अधिकारी), डॉ. सुनिता शास्त्री (प्रभारी, बीडीपीएम सब-वर्टिकल), आणि इ. एम. कार्तिक (प्रभारी, ईएसयू ) उपस्थित होते, तसेच सांडपाणी व्यवस्थापनाची टीम देखील उपस्थित होती. कार्यक्रमाला संस्कृत विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये प्रा. हरेकृष्ण आगस्ती (निदेशक, केकेएसयू), डॉ. रोशन अलोन (रजिस्ट्रार, केकेएसयू), संतोष वाडिकर (उप अभियंता), आणि प्रो. प्रसाद गोखले (निदेशक, बी.पी.डी).
CFSST plant was inaugurated jointly by Dr. S. Venkata Mohan, Director, CSIR-NEERI, and Dr. Atul N. Vaidya, Vice Chancellor, KKSU.
CFSST plant

