मुंबईत 17 मार्च 2026 रोजी 58 व्या टपाल पेन्शन अदालतीचे आयोजन
मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ, मुंबई यांनी टपाल विभागाचे निवृत्तिवेतनधारक आणि कुटुंब वेतनधारकांसाठी दिनांक 17 मार्च 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता 58 व्या टपाल पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे.
मुख्य पोस्टमास्तर जनरल,महाराष्ट्र परिमंडळ यांच्या कार्यालयात ही पेन्शन अदालत घेतली जाईल. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये टपाल विभागाच्या सेवेत असताना निवृत्त झालेले निवृत्तीवेतनधारक किंवा निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंब वेतनधारकांच्या निवृत्तीवेतनविषयक लाभांशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी आयोजित केली जात आहे. मात्र अशा तक्रारी तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून प्रलंबित असाव्यात.
मात्र वारसा हक्काचे प्रश्न, वेतनवाढ, धोरणात्मक बाबींशी संबंधित शिस्तभंगाची प्रकरणे आणि विभागीय पदोन्नती समितीच्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित असलेली प्रकरणे यांसारख्या पूर्णपणे कायदेशीर बाबींशी संबंधित प्रकरणांचा पेन्शन अदालतीमध्ये विचार केला जाणार नाही.
निवृत्तीवेतनधारक/कुटुंब वेतनधारकांनी आपल्या तक्रारी वैयक्तिकरित्या (सामूहिकपणे किंवा इतरांच्या वतीने नाही) विहित नमुन्यात, तीन प्रतींमध्ये, खालील पत्त्यावर सादर कराव्यात:
वरिष्ठ लेखा अधिकारी / सचिव,
पेन्शन अदालत,
मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय,
महाराष्ट्र परिमंडळ,
मुंबई जीपीओ इमारत, पहिला मजला,
मुंबई – 400001
याखेरीज अर्ज ईमेलद्वारे देखील पाठवले जाऊ शकतात – accts.mh@indiapost.gov.in.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2026 आहे. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा पेन्शन अदालतीसाठी विचार केला जाणार नाही.
तक्रारी सादर करण्यासाठीच्या विहित अर्जामध्ये निवृत्तीवेतनधारक/कुटुंब वेतनधारकाचे नाव, सेवानिवृत्ती/मृत्यूच्या वेळी असलेले पदनाम, पीपीओ क्रमांक, ज्या टपाल कार्यालयातून निवृत्तीवेतन काढले जाते त्या कार्यालयाचे नाव, संपर्क क्रमांकासह टपाल पत्ता, तक्रारीचे संक्षिप्त वर्णन आणि दिनांक व अर्जदाराची स्वाक्षरी यांसारख्या तपशिलांचा समावेश आहे.
निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब वेतनधारकांना त्यांच्या प्रलंबित निवृत्तीवेतनाशी संबंधित तक्रारींच्या जलद निवारणासाठी या संधीचा लाभ घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

