सातपुर येथील वनपाल सह वनरक्षक २० हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक.

महाराष्ट्र
Share

सातपुर येथील वनपाल सह वनरक्षक २० हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक.

 

ऐरंडोल प्रतिनिधी (विज्ञान पाटील)
नाशिक जिल्ह्यातील सातपुर वनपरिक्षेत्रातील वनपाल व वनरक्षक यांना रंगेहात नाशिक लाच लुचपत विभागाकडून अटक करण्यात आली आहे. दि.21 रोजी सातपुर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील वनपरिक्षेत्रातील वनपाल व वनरक्षक 20 हजार रूपयांची लाच घेताना नाशिक एसीबीने रंगेहाथ पकडले असुन शैलेंद्र आनंद झुटे (वय-४८) वनपाल वर्ग-3 व साहेबराव बाजीराव महाजन (वय-५४) वनरक्षक वर्ग-३ असे दोन्ही लाचखोराचे नाव व पद असून या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांची हॉटेल हयात दरबार ही वनविभागाच्या मालकीचे जागेवर अतिक्रमण करून अवैधरित्या बांधकाम करून व्यवसाय करत आहे असे सांगून यातील लाचखोर कर्मचारी यांनी तुम्ही मागील दहा वर्षापासून या जागेवर अतिक्रमण केले आहे व पुढील अजून दहा वर्ष कारवाई होऊ नये असे वाटत असेल तर सुरवातीला 1 लाख रुपये व त्यानंतर तडजोडी अंती 60 हजार रुपये मागणी केली,तसेच तक्रारदार यांचेविरुध्द कारवाई न करण्यासाठी अंतिमतः तडजोडी अंती 30 हजार रुपये घेण्याचे मान्य करून,30 हजार रुपयांपैकी 20 हजार रुपये घेताना दि.21 रोजी रंगेहात पकडण्यात आले आहे त्यांचेवर शहर पोलीस स्टेशन नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लाच लुचपत परिक्षेत्र नाशिक विभागीय पोलीस अधिक्षक श्रीमती.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर व अपर पोलीस अधिक्षक श्री.माधव रेड्डी,वाचक पोलीस उपअधीक्षक श्री.नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली,सापळा प्रमुख,पोलीस निरीक्षक श्री.नितीन पाटील ला.प्र.विभाग नाशिक,सापळा पथकातील पो.ना.विनोद चौधरी,पो.ना.गणेश निंबाळकर,म.पो.अं.शितल सूर्यवंशी,चा.पो.ह.परशुराम जाधव या पथकाने मोठी कारवाई केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत