फोटोग्राफीतून अवतरले मनातील तरंग. विद्यापीठाच्या ललित कला विभागात फोटो प्रदर्शनी

NAGPUR
Share

फोटोग्राफीतून अवतरले मनातील तरंग.

विद्यापीठाच्या ललित कला विभागात फोटो प्रदर्शनी

आयक्यूएसी व एमएसएफडीए यांचे संयुक्त आयोजन

  • नागपूर : तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागामध्ये फोटोग्राफी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. विद्यापीठाचा आयक्यूएसी विभाग व महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेचा समारोप फोटो प्रदर्शनीने रविवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी झाला. मनातील तरंग फोटोग्राफीत अवतरल्याचे प्रदर्शनीमधील छायाचित्रांमधून दिसून आले. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी भेट देत फोटो प्रदर्शनीची पाहणी केली.
  • ललित कला विभागात आयोजित फोटो प्रदर्शनी उद्घाटन प्रसंगी विद्यापीठ आयक्यूएसी संचालक डॉ. स्मिता आचार्य, ललित कला विभाग प्रमुख डॉ. संयुक्ता थोरात, फोटो जर्नलिस्ट शेखर सोनी, कार्यशाळेचे प्रशिक्षक पद्मश्री सुधारक ओळवे (मुंबई), डॉ. यश अलोणे, निर्माण चौधरी, भारतीय चित्रपट अभ्यासक अमृत गांगर, एमएसएफडीएचे व्यवस्थापक श्री. प्रतीक ढमाल, सहाय्यक गौरव पवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. उद्घाटनानंतर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी कार्यशाळेत उपस्थित प्रशिक्षणार्थींनी काढलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनीची पाहणी केली. विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरातील बहुतांश छायाचित्रे एका वेगळ्या अँगलने काढलेली बघून त्यांनी कौतुक केले. राज्याच्या विविध भागातून सहभाग घेतलेल्या प्रतिनिधींसाठी एक विषय देत ‘शॉर्ट फिल्म मेकिंग’ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत १५ टीमने सहभाग घेतला. शॉर्ट फिल्म स्पर्धेत डॉ. नीलिमा चारडे (नागपूर) व प्रा. पोपट माने यांच्या ‘अंतर्मन’ या शॉर्ट फिल्मने प्रथम क्रमांक पटकाविला. मुंबई येथील जेनिफर बारला व मार्टिन मलुरी यांच्या टीमने तयार केलेल्या ‘खत’ या शॉर्ट फिल्मने द्वितीय तर संभाजीनगर येथील तुषार जाधव व कुशल बाबीस्वाल यांच्या टीमने तयार केलेल्या ‘समवन यू लव’ या शॉर्ट फिल्मने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेचे परीक्षण अनोख्या पद्धतीने करण्यात आले. ललित कला विभागातील सफाई कामगार कल्पना वाघाडे, सपना खंडारे व भौतिकशास्त्र विभागातील कुलदीप हटवार यांच्या मार्फत स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ललित कला विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. शॉर्ट फिल्म स्पर्धेतील विजेत्यांना प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
  • ३१ डिसेंबर पर्यंत फोटो प्रदर्शनी
    ललित कला विभागात आयोजित कार्यशाळेत पद्मश्री सुधारक ओळवे (मुंबई) यांनी सहभागी प्रतिनिधींना फोटोग्राफीचे प्रशिक्षण दिले. फोटोग्राफी ही एक कला आहे. या फोटोग्राफी कलेचे कौशल्य विद्यार्थी तसेच शिक्षकांना प्राप्त करता यावे म्हणून फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील पहिली कार्यशाळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागामध्ये शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने २० नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान घेण्यात आली. कार्यशाळेमध्ये विविध विद्या शाखांचे शिक्षक त्याचप्रमाणे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून सहभागी झाले. प्रशिक्षणार्थ्यांनी काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ललित कला विभागामध्ये राहणार सुरू राहणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत