शूर जवानांच्या शौर्य, पराक्रम आणि बलिदानाला मान्यवरांनी केले अभिवादन सुरेश भट सभागृहात संगीतमय अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

NAGPUR
Share

शूर जवानांच्या शौर्य, पराक्रम आणि बलिदानाला मान्यवरांनी केले अभिवादन
सुरेश भट सभागृहात संगीतमय अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

 

नागपूर – प्रत्येक भारतीयांना स्फुरण देणारा दिवस म्हणून आपण कारगिल विजय दिवसाकडे पाहतो. भारतीय लष्करातील शूर जवानांच्या शौर्याला, पराक्रमाला आणि बलिदानाला विनम्र अभिवादन करुन हा दिवस संपूर्ण भारत भर साजरा होतो. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा सैनिक कार्यालय यांच्या वतीने आज कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, व्हाईस एडमिरल किशोर ठाकरे, ब्रिगेडियर राहुल दत्त यांच्यासह आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात कारगिल विजय दिवसातील शूरवीरांना मानवंदना देत अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी देशासाठी आपला प्राणाची बाजी लावणाऱ्या शुर वीरांच्या वीर पत्नी, वीर माता, वीर पिता यांना सन्मानित करण्यात आले. तसेच सैन्य दलात नागपूर जिल्ह्यातील असलेल्या व अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी, जवानांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचयही यावेळी करून देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ शिल्पा खरपकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत