भूमाफियांकडून वास्तू विशारद संदीप पाटील यांच्या जीवाला धोका

महत्वाची बातमी
Share

भूमाफियांकडून वास्तू विशारद संदीप पाटील यांच्या जीवाला धोका

विनोद काळकोपरे:- कल्याण तालुका प्रतिनिधी

कल्याण डोंबिवली महानगरपालिका पालिका अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात अडकली आहे .वास्तू विशारद संदिप पाटील यांनी अनधिकृत बांधकामाच्या विरोधात रान उठवत ६५ बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल करत त्यांना ईडी या खात्याच्या फेऱ्यात आणले आहे .
कल्याण डोंबिवली महानगरपालिका मधील मागील आयुक्त ते सहाय्यक आयुक्त ,अधिकारी हे सर्व अनधिकृत बांधकाम प्रकरणाला कारणीभूत आहेत.कल्याण डोंबिवली महानगरपालिका मधील बिल्डर लॉबी ने बनावट सही शिक्के तयार करून बांधकाम परवानगी मिळवली असे भासवले व ती कागदपत्रे सादर करून नंतर रेरा प्राधिकरण रजिस्ट्रेशन चे बांधकाम प्रमाणपत्र ही मिळविले. नंतर या सर्व प्रकरणाच्या मुळाशी गेल्यावर वास्तू विशारद संदीप पाटील यांच्या असे लक्षात आले की बनावट कागदपत्रे सादर करून आरक्षित भुखंडावर अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या आहेत. तेव्हा ६५ बिल्डरांच्या विरोधात ईडी चा ससेमिरा मागे लागला आहे व तसेच एसआयटी कडून चौकशी सुरू करण्यात आली आहे .तसेच एका आरक्षित बगीचा भूखंडाची तक्रार ही संदीप पाटील यांनी केली होती. तसेच बीएसयुपि अंतर्गत ९० अपात्र लाभार्थ्यांना घरे देऊ नये म्हणून उच्च न्यायालयात याचिका ही दाखल आहे .व ते प्रकरण न्यायप्रविष्ट ही आहे . त्याचप्रमाणे आरक्षित भूखंडावर अनधिकृत इमारती विरोधात न्यायालय मध्ये धाव घेतली असून असे बरेच भ्रष्टाचाराचे पुरावे त्यांनी मिळवली व भ्रष्टाचार उघड केल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे . व काही दिवसांपासून संदीप पाटील यांच्यावर कोणीतरी पाळत ठेऊन आहेत . या प्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये संदिप पाटील यांनी तक्रार ही केली आहे .हे प्रकरण पोलिसात घेऊन गेले असता संदीप पाटील यांनी पोलीस संरक्षण मागितले असताना त्यांना संरक्षण मिळाले नाही आहे . व स्वतःच्या बचावाकरिता अग्नीशस्त्र परवाना मागितला असता तो ही मिळाला नाही आहे . पुढील काळात संदीप पाटील यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यास संबंधित पोलीस अधिकारी जबाबदार असतील तेव्हा तात्काळ संदीप पाटील यांस पोलीस संरक्षण पुरविणे गरजेचे आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत