*अल्कोहोलिक्स अनॉनिमस सुप्रभात समुह ब्रम्हपुरी 05 व्या वर्धापन दिनाचे आयोजन.

सामाजिक
Share

*ब्रम्हपुरी प्रतिनिधी*
*दि.07/12/2023*

*होय… सुटू शकते दारुचे व्यसन.

*होय… सुटू शकते दारुचे व्यसन!*

अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस एक आंतरराष्ट्रीय सभा आहे.ज्या लोकांची दारु पिणे ही गंभीर समस्या बनली आहे.त्या लोकांना ए.ए.च्या सभेत आध्यात्मीक कार्यक्रमाद्वारे स्वस्थ,सुंदर,संतुलीत जीवन जगण्याचा मार्ग मिळतो.केवळ उच्चशक्तीच्या कृपेने व आपल्या सर्वांच्या सहकार्याने ए.ए.सुप्रभात समुहाला 05 वर्ष पूर्ण झाले आहेत.या अनुषंगाने “मद्यपाश – एक जीव घेणारा आजार” या विषयावर जनजागृती सभेचे आयोजन जि.प.प्राथ.शाळा क्र.03 गुजरी वार्ड,ब्रम्हपुरी.येथे दिनांक 10 डिसेंबर 2023 रोज रविवार ला दुपारी 01 वाजता ते 03 वाजता पर्यंत केले आहे.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा.डाॅ.श्रीकांत कामडी प्रभारी वैद्यकीय अधिक्षक,उपजिल्हा रूग्णालय ब्रम्हपुरी,मा.श्री.सुशीलजी वासनिक सामाजिक कार्यकर्ते,मा.ऑड.विजय नाकतोडे आदी वक्ते उपस्थित राहणार आहेत.परीसरातील जास्तीत जास्त संख्येने आपल्या कुटूंबियासह उपस्थित राहून कार्यक्रमा आस्वाद घ्यावा असे आवाहन सुप्रभात समुहा च्या आयोजकांनी केले आहे.तसेच नियमित सभा हि रविवार सकाळी 8.30 ते 9.30 व बुधवार सायंकाळी 6.00 ते 7.00 वाजता पर्यंत सुरू राहणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत