चंद्रपूर विभाग प्रवासी कार्यकर्ता शिबिराचे भूमिपूजन संपन्न.
गडचिरोली – दिनांक १० डिसेंबर २०२३ ला गडचिरोली येथील गोंडवाना सैनिक विद्यालय येथे सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न झाले. हे भूमीपुजन विदर्भ प्रांत शारीरिक शिक्षण प्रमुख प्रशांतजी दानी, प्रांत बौद्धिक प्रमुख उल्लासजी इटनकर, विभाग कार्यवाह दत्ताजी बहाद्दुरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

शिबीर २३-डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत निवासी होणार आहे. हे शिबीर चंद्रपूर विभागाचे असून या शिबिरात विभागातील सर्व मंडलातून कार्यविस्ताराचे लक्ष गाठण्यासाठी १२०० प्रवासी कार्यकर्ते या शिबिरात सहभागी होणार आहे. हे शिबीर एक आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. शिबिरात चंद्रपूर विभागात चालणाऱ्या सेवा कार्य, समग्र ग्रामविकास, जनजाती योद्ध व इतर विषयावर प्रदर्शनी असणार आहे. या शिबिरात विविध विषयावर चर्चा –उद्भोधन –मार्गदर्शन लाभणार आहे.
या शिबिरात विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील गोविंदपूर, येवली येथील मातृशक्ती तर्फे शिबिरा मध्ये प्रत्येक घरातून पोळ्या संकलित करून पाठविण्यात येणार आहे,
दिनांक २३ डिसेंबर ला सायंकाळी ०६.०० वाजता शहरातील मुख्य मार्गावरून या सर्व सहाभागी शिबिरार्थी यांचे पथसंचलन निघाणार आहे.
या प्रसंगी विभाग सह कार्यवाह सुभाष जी इटनकर, विभाग प्रचारक दिनदयाल जी कावरे व विभाग सहप्रचारक सागर जी अहेर, शिबिराचे व्यवस्था प्रमुख ताराचंद कुणघाडकर व अन्य स्वयंसेवक उपस्थित होते.

