आंदोलनाचे ऑडीट सामाजिक आंदोलनातल्या राजकीय वाटा

महत्वाची बातमी महाराष्ट्र
Share

आंदोलनाचे ऑडीट

सामाजिक आंदोलनातल्या राजकीय वाटा

नागपुर : मनोज जरांगे आंदोलनात सामाजिक वेदना आहेत , संताप आहे मनस्ताप आहे , विद्रोह आहे चीड आहे चीडचीड देखील आहे , मराठा समाजातील गरिबांना आधार दिलाच पाहिजे , मात्र संविधान संमत वाटेने , मात्र दोन वेळा घशातून बाहेर काढून घेण्यात आले याने समाज त्वेषाने सरकारच्या समोर ठाम भूमिकेत आला , जातीय बांधिलकीने समाज एकवटला , पाहिजेच हि भावना हट्ट बनली कधी हटखोर देखील मात्र यावर कुणाचा आक्षेप या साठी नाही कि गरीब मराठ्यांची मागणी हि काही आजकालची नाही तर गेली ४० वर्षे हा समाज न्याय मागतो आहे , अण्णासाहेब पाटील ते काकासाहेब पाटील अश्या १५० आत्महत्यातून लढा प्राणांतिक झाला , सराटी च्या हल्ल्याचे निमित्त झाले , तात्कालिक कारण घेऊन हूर ( राखेखालची धग ) शिलगली आणि समाजाची भावना निर्माण झाली आज नाही तर कधीच नाही , या भावनेला जरांगे नावाचा निरागस आवाज लाभला त्यामुळे , सरळ माणूस म्हणून लढ्याच्या तोंडाला जरांगे पुढे केले , लढ्याचे टोक टोकदार झाले , सरकारने मराठे पेटते ठेवण्यात कायदा सैल सोडला , मिडीयाने लढा घराघरात नेला , मराठ्यांनी मोगडा टाकला त्या जमिनीत मग सत्तेने सोयीचे बियाणे पेरले , ओबीसी चे आकुंचन साधताना देवेंद्र यांचे डीएनए वक्तव्य असो , किवा मग भाजपच्या मित्रपक्षाचे नेते भुजबळ यांच्या सभा , गरीब मराठ्यांची मागणी राहिली बाजूला मात्र आंदोलनाने निर्माण झालेल्या स्थितीत ज्याने त्याने आपले गोल शोधण्याची कसर सोडली नाही, अजून ते प्रयत्न करताना अनेकांची काहिली दिसुन येते आहे , मात्र समाज म्हणून समाजाच्या एकीवर जुगार खेळणारे नियतीच्या गिनतीत आणि नीतीमत्तेच्या चाळणीत येतील , समाज स्वतच्या लेकरांच्या भविष्यासाठी रस्त्यावर आहे , ते आरक्षणाची वाट चालत आहेत मात्र या गर्दीत स्वतची राजकीय वाट कुणी सोधत असेल तर समाज नावाच्या आई सोबत तो दगा ठरावा . कारण ज्या वाटेने आलो तो लढा सामाजिक आहे , समाजाने राजकीय पक्ष नेते बाजूला ठेवली आणि लढा आरक्षणाचा म्हणून यात सहभाग दिला , कुणाचा रुपया मिंदा न घेता धंदा बंद करून , नेत्यांना गावबंदी करून आंदोलनाचे टोक टोकदार करताना समाज सिद्ध झाला यात काहींना आपले राजकीय महत्वकांक्षा तडीस न्यायच्या असतील तर समाज ते खपवून घेईल असे वाटत नाही . मुळात हा लढा मागासलेपणाचा असताना , प्रचंड श्रीमंत आणि गडगंज माणसे या आंदोलनात गरीबांचा लढा लढतात का राजकीय संधी शोधतात , मुळात सरकारच्या विरोधातला हा लढा सनदशीर कायदेशीर आणि न्यायलयीन पातळीवर , मागासलेपणा सिद्ध करून जिंकायचा लढा आहे , मात्र हा लढा न्यायलयीन पातळीवर कमी आणि रस्त्यावर अधिक रंगवताना यात राजकीय दबाव आणि त्याचे चेहरे बनण्याची सुप्त यंत्रणा आखली गेली आहे , अनेकांना या गर्दीत स्वतचे राजकीय मागासलेपण दूर करायचे असेल तर दुर्दैव आहे , आजवर जी १५० माणसे या आंदोलनात गेली , त्या १५० लोकांच्या बलिदानाची हिकमत मिळकत आणि उंची म्हणून आजची गर्दी दाहकता आहे , त्यात कुठल्या एका नेत्याचा घटनेचे श्रेय ग्राह्य नाही , जेव्हा या आंदोलनात राजकीय भूमिका राजकीय संधी शोधल्या जातील तेव्हा या आंदोलनातल पावित्र्य सती गेलेल असेल , यातून मराठ्यांना जातीय मतदार करण्यात जे काही यश येईल त्यामुळे मराठा जातीवादी सिद्ध होईल , यास प्रतिवाद आणि प्रतिसाद म्हणून ओबीसी आकुंचन नैसर्गिक साधले जाईल आणि मराठे दोन्ही कडून नुकसानीस प्राप्त होईल .
अन्ना हजारे यांचे आंदोलन कॉंग्रेस ने टू जी च्या विरोधात उभे राहिले आणि लोकपाल मागण्यापर्यंत पोहचले , भारत या आंदोलनात सहभागी झाला , जगाने आंदोलनाची दखल घेतली , केजरीवाल त्यातले राजकीय उत्पादन ठरले मात्र केजरीवाल हे जातीय किवा आरक्षण आंदोलनाचे फलित नव्हते ते पर्यायी राजकीय व्यवस्था म्हणून होते आणि तो राजकीय पर्याय , कारभार , भृष्टाचारमुक्त व्यवस्था आणि निरागस चेहरे म्हणून यशश्वी झाले , मराठा आंदोलन मात्र आरक्षण या एकमेव मागणीसाठी आहे आणि यातला दुसरा प्रतिवाद आहे , जो हजारे आंदोलनात नव्हता . यामुळे वर्तमान मराठा आरक्षणात जो कुणी राजकीय संधी सोधताना , त्यासाठी वाट चालणार असेल तर यातून ते आणि समाज दोहांची फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही .
………………………….

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत