काष्ट्राईबचा मोर्चा विधानभवनावर धडकला

NAGPUR
Share

काष्ट्राईबचा मोर्चा विधानभवनावर धडकला

नागपूर –महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ द्वारा पदोन्नतीतील आरक्षण व आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी आज रोजी अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राईब महासंघ यांचे नेतृत्वात भव्य आक्रोश मोर्चा विधान भवनावर धडकला
यशवंत स्टेडियम पासून निघालेला मोर्चा बर्डी टी पॉईंट वर अडविण्यात आला.

त्यानंतर झालेल्या सभेला अरुण गाडे अध्यक्ष,गजानन थुल सरचिटणीस, सीताराम राठोड,उप महासचिव शिवाजी गावंडे,अध्यक्ष रुग्णवाहीका चालक संगठना दीपक शेंडगे,किशोर पवार, उमाकांत रामटेके, श्यामराव हाडके,विशाखा काळबांडे,अध्यक्ष काष्ट्राइब अंगणवाडी सेविका संगठना, सुषमा कळमकर,अध्यक्ष काष्टाइब महिला आघाडी प्रा डाँ नंदकुमार खोब्रागडे, अध्यक्ष, काष्ट्राइब डाँ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांनी मार्गदर्शन केले. मोर्चाचे नियोजन काष्ट्राइब रुग्णवाहिका चालक संगठना यांनी केले.पदोन्नती तील आरक्षण कायम करावे, रुग्णवाहीका कंत्राटी चालकांना बाह्यस्रोत भर्ती बंद करून शासन सेवेत समयोजन करावे रुग्णवाहीका चालकांचे काम 8 तास करावे, समान काम समान वेतन लागू करावे,आरोग्य सेवेतील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे.4.5लाख रिक्त पदे भरण्यात यावी,नागपूर जिल्हा ति ल आउट सोर्सिंग च्या कर्मचाऱ्यांना स्थाई करावे,अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना किमान वेतन 26 हजार /महिना लागू करावे.या मागण्यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला, मोर्चाचे निवेदन मुख्यमंत्री उपस्थित न झाल्यामुळे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा डाँ तानाजी सावंत यांना देण्यात येऊन चर्चा करण्यात आली. अधिवेशन संपल्यानंतर मुंबईला बैठक आयोजित करून प्रश्न निकाली काढण्यात येईल असे स्पष्ट केले.
या वेळी, प्रदीप लोखंडे, प्रतिभा खोब्रागडे, रंजना झाडें, दिपलता पाटील, अरविंद पाटील,मनीषा फुलझेले सह हजारो कर्मचारी मोर्च्यात सामील झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत