ग्रामपंचायत मतदार आणि सदस्य अधिकार आणि कर्तव्य,
*सामान्य ग्रामपंचायत मतदार,*
1) पंचायत निवडणुकीत आपल्या वार्डाचा प्रतिनिधी (ग्रामपंचायत सदस्य)
निवडून देण्यासाठी वार्डातल्या प्रत्येक जागेसाठी एक मत देणे.
2) प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सदस्य आहे.
सभेत हजर राहणे सभेत भाग घेणे ग्रामपंचायत कारभाराबाबत काही शंका असल्यास त्या विचारने मतदानाची वेळ आल्यास मतदान करणे.
3) ग्रामसभेच्या विचारण्यासाठी आपला प्रश्न लेखी स्वरुपात सभेच्या किमान दोन दिवस आधी सरपंचाकडे मतदार देऊ शकतो.
4) आपला प्रश्न ग्रामसभेत विचारण्यासाठी अजेंड्यावर आला नाही किंवा आयत्या वेळचा विषयी म्हणून सभेपुढे आला नाही तर त्यांची कारणे तो सेवेच्या अध्यक्षांकडून जाणून घेऊ शकतो. (काही कारणांनी विषय नाकारण्याचा अधिकार अध्यक्षला आहे.)
5) ग्रामसभेत आपली मते मांडणे.
6) पंचायत संबंधी कोणतीही माहिती लेखी अर्ज करून सरपंचाकडून मिळविणे.
7) सरपंच/उपसरपंच/सभासद नीट काम करत नसेल तर त्यांच्या विरुद्ध जिल्हा परिषद आदेशाकडे किंवा जिल्हा अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करणे ही तक्रार कोणीही करू शकतो.
8) सरपंच उपसरपंच यांनी वर्षातून किमान दोनदा ग्रामसभा बोलावली नाही तर त्याविरुद्ध लेखी तक्रार करणे हा कारणास्तव जिल्हा परिषद स्थायी समिती त्यांचे पंचायत सदस्यत्व रद्द करू शकते.
9) ग्रामसभेत अविश्वास ठराव 2/3 बहुमताने पास झाला तर त्यावर राज्य शासन सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही.
*कर्तव्य*
1) ग्रामपंचायत निवडणुकीत मत देणे.
2) आपण निवडून दिलेल्या पंचायत सदस्याला मदत करणे.
3) आपल्या वर्गातल्या अडचणीबाबत बहुसंख्य मतदाराच्या सहनी सरपंचाकडे रीतसर अर्ज करणे.
4) आपल्या वार्डातल्या लोकांच्या विशेषत: गरिबाच्या/अपंगाच्या/वृद्धांच्या/अनाथांच्या वैयक्तिक अडचणीबदलही सरपंचाकडे अर्ज करणे.
5) आपण केलेल्या अर्जाची प्रत व माहिती आपल्या पंचायत सदस्याला किंवा इतरही सदस्यांना देणे.
6) आपल्या अर्जाचा पाठपुरवठा करणे.
7) ग्रामसभेची नोटीस सात किंवा चार दिवस आधी व योग्य येते की नाही यावर लक्ष ठेवणे.
8) ग्रामसभेस वेळेवर हजर राहणे आणि मिनिटबुकात सभा सुरू होण्याआधी सही करणे.
9) सरपंच उपसरपंच व पंचायत सभासद व ग्रामसेवक हे काम बरोबर करत नसल्यास ती बाब जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हाधिकारी गट विकास अधिकारी यांच्याकडे नजरेस लेखी तक्रार करून आणणे.
10) ग्रामसभेत नियमानुसार भाग घेणे.
*ग्रामपंचायत सदस्य अधिकार*
1) निवडणुकी नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या तारखेस एकाला सरपंच पदावर व दुसऱ्याला उपसरपंच पदावर निवडून देण्यासाठी प्रत्येकी पदासाठी एक एक मत देणे.
2) पंचायतीच्या सभेत स्वतःच्या ठराव मांडणे.
3) स्वतःच्या ठरावाचे समर्थन करण्यासाठी बोलणे किंवा इतर कुणाही सभासदाच्या ठरावा विरुद्ध स्वतःचे मत मांडणे आणि ठरावाच्या मंजुरीसाठी मत देणे किंवा विरोध मत देणे अथवा तटस्थ राहणे.
5) पंचायतीच्या मालमत्तेच्या दुरूपयोग करणाऱ्या पंचायतीच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या आणि पंचायत अठराव्या याची अंमलबजावणी न करणाऱ्या पदाधिकारी विरुद्ध जिल्हा परिषद आदेशाकडे किंवा जिल्हा अधिकाऱ्याकडे अर्ज करणे.
6) पंचायतीच्या कारभारावर व नोकरावर देखरेख करणे.
7) पंचायतीची मिळकत व ग्रामनिधी यांचा उपयोग योग्य रीतीने होते की नाही यावर लक्ष ठेवणे.
8) निवडून दिलेल्या सरपंचाने उपसरपंच आणि जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नाही तर त्यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव पंचायतीत मंजूर करून घेऊन त्याला पदावरून काढून टाकणे.
सह्या साठी अविश्वासाचा ठराव पंचायतीच्या एकूण सभासदांपैकी 1/3 संकेत सभासदांच्या सह्यांनी मांडला पाहिजे .
9) पंचायती चे कार्य करण्याची इच्छा राहिली नाही तर सभासद पदाचा राजीनामा देणे,
*कर्तव्य*
1) पंचायत च्या सर्व सभांना हजर राहणे आणि सभेत चांगला भाग घेणे.
2) काही कारणास्तव पंचायतचे काम काही काळापुरते करता येणार नसेल तर त्या बुद्धीसाठी रजा आधीच अर्ज करून मंजूर करून घेणे अशी रजा एका वेळेस सहा सहा महिन्यापर्यंतची मिळते. अशी रजा मंजूर न करता सगळ सहा महिन्यात झालेल्या पंचायतीचा सभांना गैरहजर राहिल्यास सहा महिने संपताच त्यांचे/ तिचे सभासदत्व रद्द होते. पंचायत ठराव करून त्याला पुन्हा सभासद करू शकत नाही.
3) रजा न घेता सगळ चार महिने परगावी घेतल्या व्यक्तीचे सभासदत्व आपोआप रद्द होते. दोन्ही बाबतीत पद रिकामे झाले की नाही हे ठरविण्याचा अधिकार जिल्हा परिषद अध्यक्ष ला आहे याबाबतीत जिल्हा परिषद अध्यक्षा ने दिलेल्या निर्णयावर निकालाच्या तारखेपासून 15 दिवसात राज्य सरकारकडे अपील दाखल करावे लागते.
4) आपल्या वॉर्डातल्या तक्रारी पंचायत पुढे मांडून त्यांचे निवारण करू घेण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न करणे.
5) पंचायतीने ठराव करून आपल्यावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडणे.
6) पदाधिकारी सचिव आपल्या कर्तव्यात कसूर भ्रष्टाचार वगैरे करत नाहीत ना यावर बारीक नजर ठेवणे आणि असे काही लक्षात असल्यास ताबडतोब पंचायत च्या सभेत तो विषय मांडणे.
*काय करू नये*
1) कोऱ्या कागदावर कधीही/ सह्या अंगठा देऊ नये.
2) निरक्षर असल्यास लिहायला वाचायला येणारे दोन-तीन विश्वासू मित्र असले पाहिजेत ते केव्हाही आपल्या बाजूचे साक्षीदार म्हणून उपयोगी पडतील असे असले पाहिजेत.
3) सभेची आमंत्रणे कायद्याप्रमाणे देतात की नाहीत यावर लक्ष ठेवावे.
4) पंचायतीच्या प्रत्येक सभेत स्वतः हजर राहणे.
5) सभा न भरवता मिनिटबुकात सही मागितली तर मूळीच सही देऊ नये.
6) सभेत विषयाकडे लक्ष द्यावेत. म्हणजे सभेची मिनिटे (अहवाल) तपशील लिहिलेला आहे का किंवा बदलला आहे हे लक्षात येईल.
सभेत झालेला ठराव आणि मिनिटबुकात लिहिलेला ठराव यात का अक्षराचा ही फरक असता कामा नये.
7) आपण मांडलेल्या विषय ठराव सूचना याची नोंद अहवालात लिहिली जाईल याच्यावर लक्ष ठेवावे.
8) आपण राजीनामा दिलेल्या नसतानाच आपण हजर असताना किंवा नसताना आपला राजीनामा मानला गेला आणि मान्य केला गेला तर ताबडतोब 7 दिवसात) जिल्हा अधिकाऱ्याकडे त्याविरुद्ध अर्ज करावा.
आणि तू राजीनामा रद्द करण्याची मागणी करावी. यात राजीनामा मागे घेण्याची रद्द करण्याची कारणे लिहिलेली पाहिजेत.
आणि त्याबद्दल जरूर असे पुरावे साक्षीदार देण्याची तयारी केली पाहिजे असा अर्जावर पंधरा दिवसात निकाल देण्याचे बंधन जिल्हा अधिकाऱ्यावर आहे पण त्यांनी निकाल आपल्याविरुद्ध दिला तर त्या विरोधात सात दिवसात अपील विभागीय आयुक्तांकडे करता येते.
त्या अर्जाला अडीच रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावावा लागते. या अपील चा निकाल सुद्धा जर विरोध केला तर त्यांच्याविरुद्ध कुठलाच कोर्टात जाता येत नाही पण अशा परिस्थितीत राज्य सरकारकडे त्या निकालाच्या विरोधात दाद मागता येते.
*पंचायत सभासदांनी पुढील गोष्टी कदापी करू नये*
1) लोकांकडून ग्रामपंचायतीसाठी पैसे वसूल करणे.
2) पंचायतीच्या वतीने पैसे स्वीकारून पावती देणे
3) पंचायतीचा पैसा स्वतःजवळ ठेवणे.
4) पंचायतीची रजिस्टर ए व कागदपत्रे स्वतःच्या कब्जात ठेवणे.
*ग्रामपंचायत चा अधिकार स्वीकारताना सरपंच किंवा उपसरपंच यांनी कोणते महत्वाचे कागदपत्र पाहून घेतले पाहिजे त्यांची यादी*
1) ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत इतीवृत्त ठेवलेली नोंदवही.
2) झालेल्या ग्रामसभेच्या इतिवृत्ताची नोंदवही.
3) ग्रामनिधी चेकबुक शिल्लक असलेली रक्कम तपासून घेणे.
4) ग्रामनिधीव्यतीरिक्त अन्य कॅशबुक ठेवले असल्यास त्याची चौकशी करून ते पाहून त्यामध्ये दाखवलेली शिल्लक रक्कम तपासून घेणे.
5) नियमाप्रमाणे सरपंचाना रुपये पन्नास खर्चासाठी स्वतः कडे ठेवता येतात.
अशी रक्कम सरपंचाकडे दिली आहे का आणि दिली असल्यास त्यातील किती रक्कम शिल्लक आहे. असल्यास ती पूर्वीच्या सरपंचाकडून जमा करून घेणे.
*पंचायतीच्या मालमत्तेबाबतच्या महत्त्वाच्या नोंदवहया आणि कागदपत्रे*
1) रस्ते व जमीन खेरीज स्थावर मालमत्तेची नोंद वही.
2) रस्त्याची नोंदवही.
3) जमिनीची नोंद वही.
4) गुंतवणुकीची नोंदवही.
5) आगाऊ रक्कम किंवा ठेवी यांची नोंद वही.
*ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाबाबतचे/कराबाबतची कागदपत्रे*
1) आकारलेल्या कराची मागणी नोंदवही.
2) इतर कर आणि शुल्क फी यांच्या बाबतीत तयार केलेले आकारणी यादी.
3) संकीर्ण मागण्याची नोंदवही.
*इतर महत्त्वाची कागदपत्रे*
1) जन्म मृत्यू आणि विवाह यांची नोंदवही.
2) ग्रामपंचायतच्या प्रॉपर्टीची नोंदवही.
3) घरपट्टी आकारणी ची नोंदवही.
4) कर्मचाऱ्यांचा हजेरीपट व वेतनपत्रके.
*महाराष्ट्रातील जनसामान्य जनतेसाठी सर्वांसाठीच माहितीभ्रष्टाचार व बोगस काम करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करता येते.याविषयी सामान्य व्यक्ती ही माहिती कोणीही कार्यालयास लेखी स्वरूपात अर्ज देऊन काढू शकतात, भ्रष्टाचार रोखला पाहिजे अधिकाऱ्यांना विचारल पाहिजे, कुठलाही अधिकारी व कर्मचारी मालक राहू शकत नाही ते आपल्या जनतेचे नोकर आहेत जनता मालक आहे, विचारण्याचा हक्क आपल्या सर्वांनाच आहे,ही माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यात यावी म्हणून हा माझा उद्देश आहे, याविषयी कोणाला अडचण येत असेल तर मला बिंदास फोन करू शकता किंवा व्हाट्सअप वर कमेंट करू शकता.

