नागपूरच्या बजाज नगरच्या अभिनव क्रीडा मंडळाची भरारी

NAGPUR सामाजिक
Share

नागपूरच्या बजाज नगरच्या अभिनव क्रीडा मंडळाची भरारी

 

 

नागपूर :- महाराष्ट्रात व्हॉलीबॉल मध्ये नागपूरचे नाव विशेषत्वाने घेतल्या जाते, त्यात अभिनव क्रीडा मंडळाचे नाव अव्वल स्थानी आहे, अभिनव ने मीना रामटेके, अंजली देशपांडे, प्रफुलता तांबे, प्रिती रायपूरे, अरूणा आर्वे या पाच शिवछ्त्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू देवून नागपूरच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला आहे. याच बरोबर अनेक राष्ट्रीय पुरस्कार घडविले आहे, अभिनव ला नजर लागली आहे, काही वर्षापासून अभिनव क्रीडा मंडळ बंद असल्यामुळे बजाज नगर च्या मैदानात काही तरी हरवल्या सारखे राहून राहून वाटते, क्रीडा संघटक व वरिष्ठ खेळाडूंनी वेळीच लक्ष दिले असते तर आज ही या मैदानावर रेलचेल दिसली असती.
१९७६ मध्ये स्व रमेश लालखेडकर सरांच्या पुढाकाराने बजाज नगरच्या मैदानावर अभिनव क्रीडा मंडळ च्या नावाने व्हॉलीबॉल चा मुलींचा क्लब सुरु झाला, या क्लब ची सुत्र स्व देव काका, जंयत देव, विनोद, सुधीर देशपांडे यांच्या कडे सोपविण्यात आली, या चौद्यांनी प्रभम बजाज नगर मैदाना शेजारी राहणाऱ्या मुलींना प्रशिक्षीत करणे सुरु केले, पाहता पाहता मोठया प्रमाणात सरावा करीता मुली यायला लागल्या, शालेय स्पर्धा मध्ये मुलीनी भरीव कामगिरी करीत अभिनव क्रीड़ा मंडळाने उत्तुंग भरारी मारणे सुरु केले, राणी देव,सुषमा देशपांडे,माधवी शेरकी, अनुपमा ब्राम्हणकर,वृंदा थुटे, आस्मिता तारे, माया जोशी, देवयानी देशमुख, खोत,मयूरी दामले,विदुला गुरु,प्रेरणा चाफले, प्रिया कन्नन, विभूती मिश्रा या खेळाडूंनी विविध स्पर्धा मध्ये जोरदार कामगिरी करीत क्लब करीता रोख बक्षिसी पटकावली, यातूनच क्लबची भरारी सुरु होती,प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत खेळाडूंनी राज्यात अभिनव चे नाव चमकविले. अभिनव ने त्यानंतर मागे वळूनच बघितले नाही,
शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा मध्ये लहान मुलींनी भरीव कामगिरी करीत राज्याचे जेते पद पटकावले, त्यानंतर अनेक स्पर्धा या खेळाडूंनी गाजविल्या, स्व रामटेके काका, देशपांडे बंधुनी मैदानालाच वाहून घेतले होते.क्लबची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे क्रीडा संघटकांना आपल्या जवळून पैसे टाकून क्रीडा मंडळ चालवावे लागले.
१९९० मध्ये शिव छ्त्रपती पुरस्कार विजेते गिरीश गदगे यांनी क्लब ची धूरा हाती घेतल्यानंतर अतुल गुरु याने मैदानाची जबाबदारी आपल्या हाती घेतली, अभिनव क्रीडा मंडळात वरिष्ठ खेळाडू ज्यूनियर खेळाडूंना घडवित असताना मीना रामटेके हिला राज्याचा मानाचा शिव छत्रपती पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
गिरीश गदगे यांनी क्लबची आर्थिक स्थिती सुधरविण्याचा प्रयत्न केला, प्रकाश साठे,रमेश बक्षी, स्व प्रतापराव लिमसे,मोहन साठे, यांनी योगदान केले, या दरम्यान अतुल गुरु यांनी मला आजीवन सदस्यत्व बहाल केले,त्यानंतर क्लबने अनेक स्पर्धा आयोजीत केल्या,
मागे पडलेल्या क्रीडा संघटकांनी एकत्र येवून मृत प्राय झालेला क्लब सुरु करण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत