बांधकाम कामगार संघटना जिल्हा कार्यकारिणी मिटिंग संपन्न
विज्ञान पाटील तालुका प्रतिनिधी
बांधकाम कामगार संघ जिल्हा कार्यकारणी सर्व पदाधिकारी सप्रेम नमस्कार. आपल्या बांधकाम कामगार जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग दिनांक 9/2/2024. शुक्रवार रोजी ठीक12.30वाजता भारतीय मजदूर संघ जिल्हा कार्यालय बि जे. मार्केट येथे आयोजित करण्यात आली होती पी जी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग संपन्न झाली. मीटिंगसाठी भारतीय मजुर संघटना जिल्हा सचिव सचिन लाड वंजारी, बांधकाम कामगार संघटना. जिल्हाध्यक्ष श्री प्रवीण मिस्तरी उपजिल्हाध्यक्ष श्री प्रवीण शिरसाट तसेच जिल्हा सचिव सुनील कोळी, ऐंरंडोल तालुका अध्यक्ष गणेश भाऊ मराठे ,ऊप अध्यक्ष बाळु भाऊ सोनार ,विज्ञान पाटील, नितीन पाटील,रावन पाटील , भगवान वाघ,राजु एकनाथ महाजन मीटिंगसाठी उपस्थित होते.मीटिंगमध्ये खालील विषयांवर चर्चा करण्यात येईल 1.जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा.2.सन.2023 वार्षिक वर्गणी. बी एम एस पंढरपुर अधिवेशन.3.कामगारांच्या पाल्यांना मिळालेल्या शिष्यवृत्ती देणगी व इतर क्लेम विषयी चर्चा करण्यात आली.


