चंद्रपूर येथे ओबीसी जनगणना संकल्प यात्रेच्या जनगणना रथाचे स्वागत करून रॅलीत सहभागी
चंद्रपूर : गेल्या काही वर्षांपासून ओबीसींच्या हक्क आणि अधिकारावर घाला घालण्याचे षडयंत्र केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. लोकसंख्येच्या आधारावर ओबीसींना त्यांचा वाटा मिळावा, हक्क आणि अधिकार मिळावे यासाठी जनगणना करणे आवश्यक आहे. त्यामुळे देशातील ओबीसींची जेवढी संख्या तेवढी हिस्सेदारी मिळालीच पाहिजे.
ओबीसी आरक्षण, वसतिगृहे, शैक्षणिक सवलती, शासकीय नोकरीतील टक्का यासह ओबीसींचे विविध प्रश्न आणि समस्या मार्गी लावण्यासाठी जनगणना आवश्यक आहे.
या यात्रेला चंद्रपुरात प्रचंड प्रतिसाद मिळाला असून जागोजागी या यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.




