12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 94 लोकसभा मतदारसंघ आणि मध्य प्रदेशातील या आधी निवडणूक स्थगित झालेल्या, 29-बैतुल या लोकसभा मतदारसंघासाठी  7 मे 2024 रोजी मतदान होणार

12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्याची  अंतिम तारीख 19 एप्रिल 2024

राष्ट्रीय
Share

लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी  उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 94 लोकसभा मतदारसंघांसाठी राजपत्रित अधिसूचना उद्या म्हणजेच 12.04.2024 रोजी जारी केली जाईल. मध्य प्रदेशातील, या आधी निवडणूक स्थगित झालेल्या, 29-बैतुल लोकसभा मतदारसंघा साठी स्वतंत्रपणे अधिसूचना देखील 12.04.2024 रोजी जारी केली जाईल.

मध्य प्रदेशातील, निवडणूक स्थगित झालेल्या 29-बैतुल (अनुसूचित जमातीसाठी राखीव) या लोकसभा मतदारसंघासह, 94 लोकसभा मतदारसंघांमध्ये 07.05.2024 रोजी मतदान होईल. मध्य प्रदेशातील 29-बैतुल या लोकसभा मतदारसंघासाठी,  दुसऱ्या टप्प्यात  मतदान होणार  होते. मात्र, बहुजन समाज पक्षाच्या  उमेदवाराच्या मृत्यूमुळे मतदान  पुढे ढकलण्यात आले  होते.

आसाम, बिहार, छत्तीसगड, दादरा आणि नगर हवेली आणि दमण-दीव, गोवा, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात समाविष्ट असलेली राज्ये/केंद्रशासित प्रदेश आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे  वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

***

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत