साकोली विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदान लाखनी :- (कालिदास खोब्रागडे)

महाराष्ट्र
Share

साकोली विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदान

 

लाखनी :- (कालिदास खोब्रागडे)

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ६२ साकोली विधानसभा क्षेत्रातील ३ लाख २३ हजार ७७५ मतदारांपैकी २ लाख ३० हजार ९१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात १ लाख १७ हजार ९७२ पुरुष तर १ लाख १२ हजार ९४६ महिला मतदारांचा समावेश असून शेकडा प्रमाण ७१.३२ टक्के असून भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्रात असलेल्या ६ विधानसभेत साकोली विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदान झाले आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्रात भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली तर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोर, तिरोडा, गोंदिया ह्या ३ अशा एकूण ६ विधानसभा क्षेत्राचा समावेश असून एकूण मतदार १८ लाख २७ हजार १८८ त्यात ९ लाख ९ हजार ५७० पुरुष तर ९ लाख १७ हजार ६०४ महिला व १४ तृतीय पंती मतदार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत तुमसर विधानसभा क्षेत्रातील ३ लाख ३ हजार १९५ मतदारांपैकी २ लाख ४ हजार ७३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शेकडा प्रमाण ६७.५३ टक्के आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रातील ३ लाख ६९ हजार ९५३ मतदारांपैकी २ लाख ४३ हजार ४०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शेकडा प्रमाण ६६.०६ आहे. साकोली विधानसभा क्षेत्रातील ३ लाख २३ हजार ७७५ मतदारांपैकी २ लाख ३० हजार ९१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शेकडा प्रमाण ७१.३२ आहे. अर्जुनी/मोर. विधानसभा क्षेत्रातील २ लाख ५३ हजार ९४२ मतदारांपैकी १ लाख ७९ हजार ९६४ मतदारांनी मतदान केले असून शेकडा प्रमाण ७०.७८ टक्के आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्रातील २ लाख ६४ हजार ९९ मतदारांपैकी १ लाख ६५ हजार ९३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शेकडा प्रमाण ६२.८३ टक्के आहे. तर गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ३ लाख १२ हजार २२४ मतदारांपैकी १ लाख ९९ हजार ५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शेकडा प्रमाण ६३.७४ टक्के आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्रात ६७.०४ टक्के मतदारांनी मतदान केले आहे. यात साकोली विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक तर तिरोडा विधानसभा क्षेत्रात कमी मतदान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत