दरोड्याच्या तयारीत आसलेल्या दरोडे खोरांचा गंगाखेड पोलीसांनी डाव उधळला
गंगाखेड प्रतिनिधी
बाळासाहेब जंगले
विधानसभा 2024 च्या अनुषंगाने गंगाखेड पोलीस झोला पालम रोडवर पेट्रोलींग करत असतांना एक स्कार्पिओ गाडी व दोन मोटारसायकली भर रस्त्यावर दिसुन आल्याने तिथे येताच दरोड्याच्या तयारीत झुडपात लपुन बसलेल्या दरोडे खोरांनी तेथुन पळ काढला शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत आसलेल्या दरोडे खोरांचा डाव गंगाखेड पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला.
अधिक माहिती अशी की दिनांक १८/११/२०२४ रोजी विधानसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने, पो. स्टे. गंगाखेड चे सपोनि, शिवाजी सिंगणवाड, पोउनि राहुल लोखंडे, पोकॉ/राठोड असे झोला गावात पेट्रोलिंग करुन वापस येत असताना गंगाखेड ते पालम जाणारे रोडपासून झोला गावाकडे जाणारे रोडवर ५०० मिटर अंतरावर एक पांढरे रंगाची स्कॉर्पीओ गाडी व एक मोटारसायकल रोडचे कडेला उभी होती, एक मोटारसायकल रोडवर मध्यभागी आडवी लावली होती. गाडी थांबवून गाडीतुन खाली उतरून त्या मोटारसायकल जवळ गेला तेंव्हा तेथे रोडचे खाली अंधारामध्ये झुडपाचे आडोशाला दबा धरून बसलेले पाच दरोडेखोर पोलीसांना पाहुन पळून जात होते त्यांचा पाठलाग केला परंतु ते अंधाराचा फायदा घेवुन तेथुन पळून गेले, परत त्या स्कॉर्पीओ गाडीची पाहणी केली असता त्या स्कॉर्पीओ गाडी क्र. एम. एच २२ यु ३०३० गाडीमध्ये पाठीमागचे सीटचे खाली पांढरे रंगाचे पोत्यामध्ये दोन तलवार व फरशाचे चार हत्यार आढळून आले. पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे साहेब यांना फोन करून माहीती दिली असता त्या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी गंगाखेड टिपरसे, पोलीस निरीक्षक वाघमार साहेब ,सपोनि लोणीकर, पोउपनि गंगलवाड इतर अधिकारी व अंमलदार यांना घेवून तेथे आले. परत आजुबाजुचे परीसरात आरोपींचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत. त्यांनतर सदर ठिकाणी अंधार असल्यामुळे आम्ही सदरच्या दोन मोटारसायकल नंबर एम एच २२ एई ०२२३ व एम एच २२ एवाय २७१७ ग्कॉर्पीओ गाडी क्र. एम. एच २२ यु ३०३० पोलीस स्टेशन येथे जप्त करण्यात आल्या. सदर स्कॉपीओ गाडी क्र. एम. एच २२ यु ३०३० गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये ३६००/-रु चे ०६ धारधार फरशा (कु-हाडी) व तलवारी ८,००,०००/- रु किमतीची एक पांढरा रंगाची महींद्रा कंपनीची ‘स्कॉरपीओ गाडी क्र. एम. एच २२ यु ३०३०
४०,०००/- रु किंमतीची एक लाल काळी रंगाची हिरो कंपनीची पेंशन प्रो मोटारमायल नंबर प्लेट उलटी लावलेली ज्यावर नंबर एम. एच. २२ एई०२२३ असा असलेली.६०,००/- रु किंमतीची एक काळ पांढर रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारमायल नंबर एम.एच.२२ एवाय २५१७ असा एकुण मुददेमाल ९,०३,६००/- रू
वरील वर्णणाचा मुद्देमाल सपोनि शिवाजी सिंगनवाड यांनी ताब्यात घेवुन जप्त करण्यात आला.
गंगाखेड ते पालम जाणारे रोडपासुन ५०० मिटर अंतरावर झोला गावाकडे जाणारे रोडवर लाल काळे रंगाची हिरो कंपनीची पेंशन प्रो मोटारसायल नंबर एम एच २२ एई ०२२३ व काळे पांढरे रंगाची हिरो कंपनीची मोटारसायकल नंबर एम एच २२ एवाय २५१७ यावरील आणि स्कॉर्पीओ गाडी क्र. एम. एच. २२ यु ३०३० मधील अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाची पाच इसम हे वरील वर्णनाचे वाहन व शस्त्रानिशी दरोडा घालण्याचे पुर्व तयारीत असतांना आम्हा पोलीसांना पाहुन पळून गेले म्हणुल त्यांचे विरुध्द कलम ३१०(४), ३१० (५) भारतीय न्याय संहीता सह कलम ४ (२५) आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर ची कार्यवाही मा. पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी, अप्पर पोलिस अधिक्षक मा. काळे परभणी, उपविभागीय पोलिस अधिकारी गंगाखेड टिपरसे पोलिस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांचे मार्गदर्शना खाली सपोनि, शिवाजी सिंगणवाड, सपोनि लोणीकर, पोउपनि गंगलवाड, पोउपनि राहुल लोखंडे इतर अधिकारी, पोकों / १२८६ राठोड व इतर अंमलदार यांनी करण्यात आली.

