महाराष्ट्र
Share

वीज चोरी करणे आले अंगलट, इसमावर गुन्हा दाखल
 पळसगाव येथील घटना

 

कालिदास खोब्रागडे, लाखनी :- तालुक्यातील पळसगाव/कोलारी येथे विजेच्या खांबावर वायरचा आकडा टाकून वीज चोरी करतांना रांगे हात पकडले असता तडजोडी अंती दंडाची रक्कम भरण्याची संबंधितांने कबुली दिली. पण मुदतीत दंडाच्या रकमेचा भरणा केला नसल्यामुळे कनिष्ठ अभियंत्याचे फिर्यादी वरून पालांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वीज चोरट्याचे नाव गौरीशंकर पुरुषोत्तम वलथरे(३३) रा. पळसगाव, तालुका लाखनी असे आहे. पालांदूर पोलिस तपास करीत आहेत.
ग्रामीण परिसरात वीज चोरीच्या घटना सातत्याने घडत असतात. यावर आळा बसावा या करिता वीज वितरण कंपनी कडून काही उपाययोजना केल्या जात असल्या तरी मनुष्यबळाअभावी तोडक्या पडतात. वीज वितरण कंपनी केंद्र पोहरा चे कनिष्ठ अभियंता प्रशांत वांढरे हे सहकाऱ्यांसह वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबवित असताना पळसगाव येथे गौरीशंकर वलथरे वीज खांबावर वायरचा आकडा टाकून वीज चोरी करीत असल्याच्या गुप्त माहिती वरून ५ सप्टेंबर २०२३ रोजी कनिष्ठ अभियंता प्रशांत वांढरे यांचे पथकाने पकडून पंचनामा करून पंचासमक्ष जप्ती कारवाई केली. तसेच चोरी केलेल्या युनिट च्या दंडाची रक्कम आकारण्यात आली. ती रक्कम १८ जानेवारी २०२४ पर्यंत भरण्याची गौरीशंकर वलथरे यांनी कबुली दिली मात्र मुदतीत दंडाची रक्कम न भरल्याने वीज वितरण कंपनीकडून त्यांना वारंवार सूचना करूनही काही उपयोग न झाल्याने शेवटी कनिष्ठ अभियंता प्रशांत वांढरे यांचे फिर्यादीवरून पालांदूर पोलिसांनी गौरीशंकर वलथरे यांचे विरोधात भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ अन्वये वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस हवालदार भोयर तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत