मुरमाडी ग्रामपंचायतीत ज्येष्ठ कामगाराचे हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र
Share

मुरमाडी ग्रामपंचायतीत ज्येष्ठ कामगाराचे हस्ते ध्वजारोहण

 

कालिदास खोब्रागडे, लाखनी :- मुरमाडी/सावरी ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालयात ज्येष्ठ सफाई कर्मचारी ताराचंद बावनकुळे यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडण्यात आल्याने सरपंच शेषराव वंजारी यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
मध्यप्रदेश चे विभाजन करून १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. त्या प्रित्यार्थ सर्व शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेत महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुरमाडी/सावरी ग्रामपंचायतीत लोक नियुक्त सरपंच शेषराव वंजारी यांनी महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन ग्रामपंचायतीत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत ज्येष्ठ सफाई कामगार ताराचंद बावनकुळे यांना ध्वजारोहण करण्याचा मान दिला. या प्रसंगी अध्यक्षस्थानी सरपंच शेषराव वंजारी, ग्रामविकास अधिकारी एस.पी. तरजुले, उपसरपंच वनिता शेंडे, ग्रामपंचायत सदस्य संजय लांजेवार, काशीनाथ मिरासे, आतिश झलके, मनीषा बेलखोडे, शीतल हटवार, किरण टेंभुर्णीकर, नंदलाल चौधरी, दुर्गेश चोले, गीता गिरेपुंजे, संध्या गजभिये, नरेंद्र चोले, पुरुषोत्तम बावनकुळे, गीता उईके, आशा स्वयंसेविका रीना चोले, वैशाली मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता अनिल शेंडे, ग्रामस्थ यांचे प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ कामगार ताराचंद बावनकुळे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राज्य गीताने ध्वजास मानवंदना देण्यात आली. कामगार दिनी ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्याचे हस्ते ध्वजारोहणाचा नवा पायंडा पाडल्याबद्दल सरपंच शेषराव वंजारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत