मुंढरी जि.प. नूतन विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात विद्यार्थिनींचे हस्ते ध्वजारोहण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

महाराष्ट्र
Share

मुंढरी जि.प. नूतन विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात

विद्यार्थिनींचे हस्ते ध्वजारोहण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कालिदास खोब्रागडे, लाखनी :- जिल्हा परिषद नूतन विद्यालय मुंढरी/बु. येथे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाचे औचित्य साधून बुधवारी(ता.१) सकाळी ८:०० वाजता जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांचे सुचनेवरून इयत्ता ९वी ची विद्यार्थिनी कुमारी मयुरी मोरेश्वर गोमासे हिचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच २०२३-२४ मध्ये माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ८वी चा विद्यार्थी संदेश दीपक कांबळे याचा पुष्पगुच्छ देऊन आणि वार्षिक परीक्षेचे निकाल घोषित करून गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक सोमेश्वर पाल व सहकाऱ्यांचे हस्ते ट्रॉफी व गुणपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
मध्यप्रदेशातून मराठी भाषिक बहुल प्रदेश महाराष्ट्र राज्य १ मे १९६० रोजी वेगळा करण्यात आल्याने वर्धापन दिनी(१ मे) रोजी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थात मोठ्या उत्साहात वर्धापन साजरा केला जातो. जिल्हा परिषद नूतन विद्यालय मुंढरी/बु. येथे जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्यारेलाल शेंडे, उपाध्यक्ष अनमोल सार्वे, मुख्याध्यापक सोमेश्वर पाल यांचे प्रमुख उपस्थित कुमारी मयुरी मोरेश्वर गोमासे ह्या विद्यार्थिनीचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. २०२३-२४ या शैक्षणिक सत्रातील वार्षिक परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक सोमेश्वर पाल, शिक्षक व शिक्षिकेत्तर कर्मचारी यांचे हस्ते ट्रॉफी व गुणपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२३-२४ मध्ये इयत्ता ८वी चा विद्यार्थी संदेश दीपक कांबळे हा पात्र ठरल्याने त्याचेही पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत