*उन्हाळी धान पिकाची खरेदी सुरु करा* * मोहन पंचभाई यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन

महाराष्ट्र
Share

*उन्हाळी धान पिकाची खरेदी सुरु करा*
* मोहन पंचभाई यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन

 

कालिदास खोब्रागडे, भंडारा :- येथील जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना उन्हाळी धान पिकाची खरेदी सुरु करणे, ई-पिक सर्वेक्षणात तांत्रीक अडचणीमुळे नोंदी न झालेल्या शेतकऱ्यांना ऑफ लाईन पद्धतीने नोंदी घेवून सहकार्य करणे बाबद जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात गुरुवार(ता.२) रोजी निवेदन देण्यात आले आहे.
ई-पिक, पिक पाहणी सर्वेक्षणात तांत्रिक अडचणीमुळे ७/१२ वर नोंदी होवू न शकल्यामुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. तरी अश्या शेतकऱ्यांना ऑफ लाईन ७/१२ वर नोंदीचे आदेश देवून सहकार्य करावे. उन्हाळी धान पिकाची सध्या मळनी सुरु झालेली आहे परंतु ती खरेदी करण्यासंबंधाने अजूनपर्यंत कोणतीही प्रक्रिया सुरु झालेली नाही. तसेच खरीप हंगामात सुद्धा धान खरेदी उशिरा सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांना धान बाहेर व्यापाऱ्यांना विकावे लागले. त्याचप्रमाणे धान भरडाई सुद्धा बंद असून मोठ्या प्रमणात धान खरेदी केंद्रावर धानसाठा पडलेला आहे, सध्या नवीन उन्हाळी धानाची मळनी सुरु झालेली आहे. परंतू धान खरेदी केंद्र सुरु नसल्यामुळे शेतकरी बाहेर व्यापाऱ्यांना धान कमी भावात विकत आहे. अश्या परिस्थितीत नवीन उन्हाळी धान खरेदी गरजेचे आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांची फसगत होत आहे. तरी उन्हाळी धान खरेदी केंद्र तात्काळ सुरु करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे मोहन पंचभाई यांनी सांगितले अन्यथा काँग्रेस तर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा महासचिव धनंजय तिरपुडे, तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, रणवीर भुरे, विनोद भुरे, संदीप साठवणे, विनीत देशपांडे, सुरेश वैरागडे, शिवराम मदणकर व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत