नागपुरात होणार आंबा, तृणधान्य व धान्य महोत्सव 16 ते 19 मे दरम्यान आयोजन

NAGPUR महाराष्ट्र
Share

नागपुरात होणार आंबा, तृणधान्य व धान्य महोत्सव
16 ते 19 मे दरम्यान आयोजन

 

नागपूर :  पुणे येथे यशस्वीरीत्या झालेल्या महोत्सवाच्या धर्तीवर नागपुर शहरात आंबा, तृणधान्य व धान्य महोत्सवाचे आयोजन 16 ते 19 मे दरम्यान करण्यात आले आहे. महाराष्ट्र कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालयामार्फत उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे भवन येथे हा महोत्सव असणार आहे.
या महोत्सवामध्ये सहभागी उत्पादकांना40 ते 50 स्टॉल्‌स असणार आहेत. यात उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. यात तृणधान्यावर तज्ञांचे मार्गदर्शन, कोकणातील हापूस, केशर व इतर आंबा प्रदर्शन व विक्री, मिलेट व मिलेट पदार्थाचे प्रदर्शन व विक्री, धान्य, विविध डाळी व प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे प्रदर्शन व विक्री अशा स्वरुपाचे या महोत्सवाचे आयोजन असणार आहे. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत प्रदर्शन व विक्री सुरू असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत