ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील
एरंडोल: भुमी अभिलेख कार्यालया तर्फे लोकांना नेहमी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.अनेकांचे काम नेहमी पडून असते.काही लोकांचे काम हे महिने,वर्ष उलटून देखील होत नसल्याचे अनेक उदाहरण घडली आहेत तसेच काही जणांनी आत्महत्या करण्याचे देखील प्रयत्न केले आहेत.इतकं असताना देखील या कार्यालया बद्दल अनेक लोकांची नाराजी असल्याची अनेक उदाहरणं आहेत.अनेकांनी अनेक अर्ज देखील केले असून आतापर्यंत कुठलाही परिणाम या कार्यालयातील अधिकाऱ्यांवर व पदाधिकाऱ्यांवर होत असल्याचे चित्र होते.परंतु शिवाजी वना सोनवणे यांनी मौजे एरंडोल येथील गट नं. १५४९ चा बिनशेती मोजणी प्रकरणाची नक्कल मिळणेकामी लोकसेवा हक्क आयोग २०१५ अंतर्गत मागणी अर्ज केला होता.यात भूमिअभिलेख कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना ५०० रुपये प्रत्येकी दंड ठोठावण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , भुमी अभिलेख कार्यालय कडून शिवाजी सोनवणे यांनी मागीतलेली माहिती वेळेवर न दिल्याने सोनवणे यांनी प्रथम अपील दाखल केले.पहिल्या अपीलात संबंधित भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी यांनी त्यासंबंधी सोनवणे यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.नकाशाच्या प्रतची शोध चालू आहे.सापडली की त्याची नक्कल तुम्हाला पुरविण्यात येईल. त्याबाबत अपीलाची सुनावणी ३१/०१/२०२४ ला घेण्यात येईल याबाबत सुचनाही दिली आहे परंतु आवकजावक पद रिक्त असल्याने सुनावणी नोटीस वेळेवर न दिल्याने सोनवणे यांनी दुसरे अपील केले. द्वितीय अपील अधिकारी यांनी त्यासंबंधी त्यांनी मागणी केलेला नकाशाची प्रत पुरवण्यात यावी असा आदेश केल्याने सोनवणे यांना नकाशाची प्रत पुरवण्यात आली परंतु तो पण चुकीची मोजणी नकाशाची प्रत पुरवण्यात आली. याबाबत सोनवणे यांनी लोकसेवा हक्क आयोग नाशिक यांच्या कडे तिसरे अपील केले त्याची सुनावणी होऊन अर्जदारास वेळेत नक्कल न पुरुविल्याने भुमी अभिलेख उप अधीक्षक बी.सी. अहिरे व पद निर्देशित अधिकारी तथा मुख्यालय सहाय्यक योगेश एस. ठाकूर यांना प्रत्येकी ५००/- रु. शास्ती व दंड म्हणून आदेश देण्यात आला. व शिवाजी सोनवणे यांना नक्कल शासकीय फी न घेता उपलब्ध करून देण्यात यावी असे आदेश देण्यात आले.

