विश्वकर्मावंशीय समाज संघटना तफ्रे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.
ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील.
विश्वकर्मा वंशीय समाज संघटन जि.जळगांव दि.4/8/2024रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला . विद्यार्थी गुणगौरव सोहळा प्रमुख पाहुणे म्हणुन आपले जळगांव चे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व आ.राजुमामा भोळे ,माजी महापौर जयश्री ताई महाजन तसेच गोपाल दर्जी सर ,परागजी आहिरे यांनी विश्वकर्मा समाजाच्या मुलांना शैक्षणिक आत्मबल वाढवले. तसेच विश्वकर्मा वंशीय समाज संघटना यांना आ.राजुमामा यांनी मुलांना स्कूल बॅग वाटप केल्या व पालकमंत्री गुलाबरावजी पाटील मा.महापौर जयश्रीताई यांनी कार्यक्रमास आर्थिक मदत केली.वेळेवर सर्व उपस्थित असल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली व संघटनेच्या माध्यमातून आलेले सर्व मान्यवर तसेच कार्यक्रमात आलेले समाज बांधव , विद्यार्थी ,पालक ,
विश्वकर्मा वंशीय समाज संघटना चे कार्यकर्ते उपस्थित होते.

