*विश्वकर्मा क्रांती दल राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित.*

महाराष्ट्र
Share

*विश्वकर्मा क्रांती दल राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित.*

ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील

महाराष्ट्र विश्वकर्मा महासभा, बलुतेदार, मायक्रो ओबीसी समाज यांची राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित करण्यात आली .

विश्वकर्मा क्रांती दलाच्या वतीने मागील सहा वर्षांपासून सामाजिक व राजकीय सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहे .समाज संघटित करणे समाजाचे प्रश्र्न शासन दरबारी मांडून सोडविण्यासाठी काम करणे विश्वकर्मा क्रांती दलाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब पाचांळ नांदेड नेतृत्वाखाली पार पाडण्यात आली आहे. विश्वकर्मा क्रांती दलाचे अध्यक्ष बाळासाहेब पाचांळ सर यांनी नुकतीच कार्यकारिणी घोषित केली आहे या कार्यकारिणी वरती प्रविण संतोष शार्दुल ( मिस्तरी) पाचोरा यांची असंघटित कामगार योजना समन्वय पदांवर वर्णी लागली आहे. त्याबद्दल त्यांचे सुतार समाजांच्या वतीने अभिनंदन होत आहे .सध्या प्रविण शार्दुल कामगारांच्या समस्या व कामगारांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यात कार्य करत आहेत हे कार्य करत असताना राज्यातील विश्वकर्मी समाजास व सुतार समाजाशी त्याचा समाजकार्याच्या माध्यमातून जनसंपर्क निर्माण झाला याची पावती म्हणून त्यांची विश्वकर्मा क्रांती दलांच्या समन्वय असंघटित कामगार योजना या पदावर नियुक्ती झालेली आहे.व जळगाव जिल्ह्यातील समाज बांधवांन कडुन त्यांचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत