बदलापूर सह संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी अल्पवयीन मुली व महिलांवर अत्याचार करणा-या आरोपींवर कठोर कारवाई करणे बाबत दिले निवेदन.
ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील
एरंडोल :येथे महविकास आघाडी व सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी बदलापूर सह संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी अल्पवयीन मुली व महिलांवर अत्याचार करणा-या आरोपींवर कठोर कारवाई करणे बाबत एरंडोल पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांना निवेदन दिले.
निवेदनात बदलापूर सह संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी अल्पवयीन मुली व महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, राज्यात कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली असल्याचे म्हटले आहे व अशी वाईट कृत्य करणा-या नराधमांना कायद्याचा धाक उरला नसून अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणा-या आहेत. व अशा प्रकारच्या समाजविघातक घटना महाराष्ट्रात घडणे हे संपुर्णपणे सरकारचे अपयश असून महाविकास आघाडीच्या वतीने या असंवेदनशिल सरकारचा जाहिर निषेध करीत असल्याचे म्हटले असुन वरील घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी व यापुढे अशा प्रकारच्या घटना होणार नाही सरकारने कठोर पावले उचलावीत अन्यथा यापुढे महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्रात तिव्र आंदोलन छेडण्यात येवून होणा-या परिणामास सरकार जबाबदार राहिल असे सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे .
निवेदनाच्या प्रती नायब तहसीलदार घुले व पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांना निवेदन दिल्या असुन निवेदनात महाविकास आघाडी तर्फे डॉ.राजेंद्र देसले, सुनील पाटील, कमर अली सय्यद, प्रशांत पाटील, शे. सांडू.शे. मोहम्मद , जि प सदस्य नाना महाजन, किशोर महाले जगदीश पाटील,जगदीश पाटील , प्रमोद महाजन, अतुल महाजन, दशरथ महाजन, किशोर पाटील, कलीम शेख , इमरान सय्यद यांच्या सह्या आहेत.

