अखेर युवाशक्ती ग्रामविकास संगठनच्या धरणे आंदोलनाला यश.

महाराष्ट्र
Share

अखेर युवाशक्ती ग्रामविकास संगठनच्या धरणे आंदोलनाला यश.

 

सातारा :- पुढील ३ महिन्याच्या आत सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करण्याचे जिल्हा परिषद कडून लेखी आश्वासन.*

मागील दोन दिवसापासून जिल्हा परिषद सातारा समोर युवाशक्ती ग्रामविकास संगठनचे धरणे आंदोलन सुरू होते, या धरणे आंदोलनाची मागणी ग्रामविकास विभागाच्या पत्राची अमंलबजावणी करण्यात यावी म्हणजेच जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करण्याबाबत होती.

शेवटी धरणे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी या आंदोलनाला यश प्राप्त झाले, म्हणजेच २७ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा परिषद प्रशासनाकडुन युवाशक्ती ग्रामविकास संगठनच्या दोन्ही मागण्या मान्य करत सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये पुढील ३ महिन्यात बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले गेले.

या धरणे आंदोलनमध्ये पुढील पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते, युवाशक्ती ग्रामविकास संगठनचे संस्थापक/अध्यक्ष इमरान पठान सर, सातारा जिल्हाध्यक्ष सुनिल कदम, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात तरडे, जिल्हा सचिव तेजस चव्हाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विवेक चव्हाण, सातारा तालुकाध्यक्ष राजु सकटे, विनोद ननावरे, केशव शेळके, गोरख वाघ, अनिल कारंडे त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेना राज्य कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत खंडाईत सर, गणेश कारंडे, दादासाहेब केंगार यांनी या ठिकाणी भेट देऊन आंदोलनास पाठींबा दिला होता.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत