कोतवाल खोब्रागडे बेपत्ता! ८ दिवस उलटून सुद्धा उलगडा का होत नाही
सुनिल गेडाम तालुका प्रतिनिधी सिंदेवाही
सिंदेवाही :: आज च्या स्थितीत तालुक्यातील संपूर्ण जनतेचे लक्ष लागून असलेला विषय म्हणजे विरव्हा गावातील कोतवाल नंदकिशोर
खोब्रागडे बेपत्ता प्रकरण,या प्रकरणात ९ दिवस होऊन सुद्धा पोलीस प्रशासन नंदकिशोर खोब्रागडे चा शोध न घेतल्याने पाणी कुठं मुरत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे, आता पोलीस यंत्रणा वर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे दिसत आहे, सदर प्रकरणात २ आरोपीना आत्ता पर्यंत अटक केली असून त्यांच्या कडून नंदकिशोर चा सुगावा लागत नसल्याने व पोलीस प्रशासन कडून समाधान कारक माहिती मिळत नसल्याने खोब्रागडे परिवाराने पत्रकार परिषद घेऊन, सिंदेवाही पोलीस प्रशासन च्या तपास कामगिरी वर बोट ठेवले आहे, पोलीस विभागा कडून योग्य प्रकारे तपास होत नसल्याचा आरोप ठेवला आहे, ९ दिवसा पासून वडील घरी नाही म्हणून दोन्ही मुले जेवण करीत नाही आणि शाळेत सुद्धा जात नाही,सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद मध्ये पोलीस प्रशासन वर संशय व्यक्त केला आहे,दोन आरोपी अपहरण च्या गुन्ह्यात पोलीस अटकेत असून अजून पर्यंत पोलीस प्रशासन त्यांच्या कडून खोब्रागडे चा थांगपत्ता लावू शकली नाही हे विशेष,घटनेच्या दिवशी दोन अनोळखी व्यक्ती रेती पाहिजे म्हणून खोब्रागडे कडे आले व त्यांनी आपल्या सोबत आणलेल्या दुचाकी वाहणावरून बसवून नेले, सदर प्रकार हा त्यांच्या मुली ने कथन केला आहे, त्या दोन अनोळखी व्यक्ती सोबत गेलेला खोब्रागडे हा अद्याप घरी परतला नसल्याने,रात्री घरी येतो म्हणणारा पोलीस स्टेशनला तक्रार दिली तक्रार देऊन ९ दिवस लोटून सुद्धा पोलीस प्रशासन नंदकिशोर खोब्रागडे चा शोध घेऊ शकली नाही, पोलीस प्रशासन ने सदर प्रकरनातं एक दुचाकी जप्त केली ही दुचाकी नामदेव धनविजय याची आहे, तर दुचाकी नंतर ज्या चारचाकी वाहणाने नंदकिशोर खोब्रागडे ला नेले ती सोपान जिल्लारे व त्याचे चारचाकी वाहन जप्त केली आहे.विशेष म्हणजे मौजा मेंढा (माल
येथील हत्या प्रकरणात सिंदेवाही पोलीस प्रशासनाने २४ तासाच्या आत हत्येचा उलगडा करून आरोपीना गजाआड केले होते,आणि हत्या करून पुरलेल्या मृतदेह उकरून त्या महिलेच्या आरोपी मुलींना तुरुंगात पाठविले होते, इथे हत्या करणाऱ्या आरोपीना लवकर छडा लावल्या जातो पण……
कोट
बेपत्ता नंदकिशोर खोब्रागडे याचा शोध घेणे सुरु असून भावाच्या तक्रार वरून संशयित असलेल्या नामदेव धनविजय यांच्या वर अपहरण चा गुन्हा दाखल करून तीन दिवसाचा पी सी आर मिळवून त्याने दिलेल्या माहिती प्रमाणे दुसऱ्या संशयित आरोपीला अटक केली असून तपास चांगल्या प्रकारे सुरु असून लवकरच आम्ही बेपत्ता असलेल्या नंदकिशोर खोब्रागडे ला शोधून काढू
विजय राठोड
पोलीस निरीक्षक
सिंदेवाही पोलीस स्टेशन
पोलीस पाहिजे तसा तपास करीत नसल्याने आज ९ दिवस होऊन सुद्धा माझ्या भावाचा शोध लागला नाही, त्यामुळे आम्ही सिंदेवाही पोलीस प्रशासनं वर त्याच्या तपासावर आमचा अजिबात विश्वास नाही की तें माझ्या भावाला शोधतील म्हणूनं
संजय खोब्रागडे

