जळगाव येथे भारतीय मजदूर संघाच्या भारत पेट्रोलियम शाखेची स्थापना.

महाराष्ट्र
Share

जळगाव येथे भारतीय मजदूर संघाच्या भारत पेट्रोलियम शाखेची स्थापना.

 

 

ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील

जळगाव:भारतीय मजदूर संघाच्यावतीने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.एमआयडीसी जळगाव येथे जळगाव जिल्हा मजदुर संघाच्या भारत पेट्रोलियम शाखेचे संघटनेची स्थापना व फलकाचे अनावरण भारत माता की,जय च्या घोषणा व ढोल ताशाच्या गजरात मोठ्या उत्सवाच्या वातावरणात खासदार श्रीमती.स्मिताताई वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करुन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय मजदूर संघाचे प्रभाकर बाणासुरे,जिल्हाध्यक्ष अभय वीसपुते,जिल्हा सचिव सचिन लाडवंजारी, सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटना प्रसंगी खासदार श्रीमती.स्मिताताई वाघ यांनी उपस्थित कामगाराना संभोदीत करतांना भारतीय मजदूर संघ ही राष्ट्रवादी विचारांची संघटना असून प्रथम राष्ट्रहित, द्वितीय उद्योगहित,तृतीय कामगारहित,या बिंदूखाली कार्यरत असलेल्या संघटनेची शाखा स्थापित केली त्याबद्दल सर्व कामगारांचे अभिनंदन केले.तसेच कामगारांच्या काही अडीअडचणी,समस्या असतील तर भारत पेट्रोलियम केंद्र सरकारचा उद्योग असल्याने मी केंद्र सरकारची प्रतिनिधी म्हणून नक्कीच आपल्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल असे उपस्थित संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अश्वासित केले.
आमदार राजू मामा भोळे हे स्वतः उपस्थित राहु न शकल्याने फोन करुन त्यांनी सर्व कामगारांचे अभिनंदन केले तसेच कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहील अशी ग्वाही दिली.
प्रभाकर बाणासुरे यांनी भारत पेट्रोलियम कंपनी हे एक अतिशय संवेदनशिल क्षेत्र असून,आपण अशा क्षेत्रातील योद्धे आहात त्यामुळे सर्व कामगारांनी एकसंघ व संघटीत राहून कार्यरत राहण्याचे आव्हान केले.तसेच कंपनीच्या वरीष्ठ अधिकारी यांनी कामगारांच्या विषयांसंदर्भात कामगार विरोधी कोणतीही टोकाची भूमिका न घेता संघटनेच्या पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेण्याची विनंती केली.
प्रास्थाविकामध्ये सचिन लाडवंजारी यांनी भारतीय मजदूर संघाचे देशभरातील कार्य व जळगाव जिल्ह्यात विविध उद्योगामधे असलेलं संघटन याविषयी माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वितेसाठी राहुल कोळी,किरण पाटील,सदाशिव सोनार,संजय शिरसाठ,सुनिल कोळी,प्रविण मिस्तरी,प्रविण शिरसाठ,महेंद्र कोळी,जितेंद्र पाटील, गणेश भाऊ मराठे,राजेंद्र खैरनार,सूरज मुराई,किशोर सपकाळे यांनी प्रयत्न केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत