दणका शासनाचा चा!**शासकीय सेवेत असणाऱ्या महिलां कडून लाडकी बहीण योजनेचे पैसे वसुल होणार आणि दंड सुद्धा ठोकणार

चंद्रपूर जिल्हा
Share

*दणका शासनाचा चा!**शासकीय सेवेत असणाऱ्या महिलां कडून लाडकी बहीण योजनेचे पैसे वसुल होणार
आणि दंड सुद्धा ठोकणार 

सिंदेवाही : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मधील गोर गरीब बहिणी साठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली, पण या योजने मध्ये गोर गरीब महिलां च्या अगोदर ज्या महिलांना शासनाकडून मासिक पाच तें दहा हजार मानधन मिळते, अश्या महिलांनी शासनाची फसवणूक करून, या योजनेचा लाभ मिळवला, लाडकी बहीण योजनेच्या
संमती पत्रता शासनाची पुरेपूर दिशाभूल करीत फार्म भरून लाभ मिळवला, या महिला मध्ये शासकीय कार्यालय मध्ये कंत्राटी पद्धत नुसार कॉम्पुटर ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या महिलां, अंगणवाडी सेविका,मदतनीस, आशा वर्कर व अन्य महिला यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला, शासकीय योजनेचा लाभ घेताना त्या योजनेच्या अटी शर्थी नुसार योग्य व गोर गरीब महिलांना लाभ मिळला की नाही, हे बघणं सुद्धा जागरूक नागरिकांचे कर्तव्य आहे, शासन कोणतीही योजना आणत असली तरी त्या योजनेत सर्व सामान्य नागरिकांच्या कष्टची
कमाई असते,त्यामुळे सामाजिक कर्तव्य म्हणून योजनेचा लाभ कुणी घेतला व कुणाला मिळाला या बाबत बघणं हे पत्रकार च्या दृष्टीने महत्वाचे आहे, जेव्हा असं वाटलं की शासकीय सेवेत राहून पाच हजार, दहा हजार, तें पंधरा हजार मासिक मानधन घेणाऱ्या महिला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, तर मग या महिलांप्रमाणे निराधार, विधवा, अपंग महिला नी शासनाच च काय बिघडवल, त्यांना तर शासन फक्त मासिक १५०० रुपये महिना देत आहे, तें सुद्धा ४ तें ५ महिन्याच्या अंतराने, सगळ्यात गरज तर सर्व प्रथम अश्या महिलांना आहे पण अश्या महिलांना शासनाने लाडकी बहीण योजनेत समाविष्ठ नाही केल, त्या साठी निराधार, अपंग, विधवा महिलांना लाडकी बहीण योजनेत समाविष्ठ करण्यासाठी आवाज उचलला, गरजू असलेल्या महिलाबाबत
सरकार ने केलेला भेदभाव वर ताशोरे ओढले, आणि शासनाला प्रश्न केला, उशिरा का होईना शासनापर्यंत आवाज पोहचला, व शासनाने
देर आये दुरुस्त आये, नुसार शासनाची शासकीय कार्यालयात काम करीत असलेल्या महिलांनी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी फसवणूक केली हे लक्षात आलं,शासनाची फसवणूक करून उचलेले योजनेचे मानधन परत घेऊन त्याच्यावर दंड सुद्धा ठोकत असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रनुसार प्राप्त झाली आहे,या मध्ये आम्ही शासनात काम करून मासिक मानधन घेणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला या विरोधात अजिबात नाही पण त्याच सोबत विधवा, अपंग, निराधार महिलांना डावलले या साठी शासना ची चूक त्यांच्या लक्ष्यात आणून देण्याचा प्रयत्न केला होता, पण शासनाने शासकीय सेवेत काम करणाऱ्या महिलां कडून मानधन वसुल करणे सुरु केले आहे, आणि तें करायला पण पाहिजे संमती पत्रात चुकीची माहिती भरून लाभ मिळवला असल्याने शासना कडून त्यांच्या वर होत असलेल्या कारवाही चे स्वागत बुद्धिवंत व सुजाण नागरिक करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत