सार्वत्रिक विधानसभा निवडणूक एरंडोल मतदारसंघ तयारीचा घेतला आढावा निवडणूक निरीक्षक (जनरल) ब्रजेश कुमार यांनी केले अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन ….

महाराष्ट्र
Share

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक एरंडोल मतदारसंघ तयारीचा घेतला आढावा निवडणूक निरीक्षक (जनरल) ब्रजेश कुमार यांनी केले अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन ….

एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील

एरंडोल : एरंडोल विधानसभेसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी म. निवडणूक निरीक्षक (जनरल) ब्रजेश कुमार यांनी दि ०५ नोव्हेंबर २०२४ रोजी पंचायत समिती सभागृह एरंडोल येथे मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक घेतली. बैठकीदरम्यान मतदारसंघातील आचारसंहिता अंमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणी, खर्च व्यवस्थापन, मतदार जनजागृतीसह मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना इत्यादी बाबतचा आढावा घेऊन मार्गदर्शनही केले. याप्रसंगी FST टीम, SST टीम, VST टीम, VVT टीम, नोडल ऑफीसर, सेक्टर ऑफिसर यांच्याशी व्यक्तिशः चर्चा करून तयारीचा आढावा घेतला व मार्गदर्शनही केले. एकंदरीत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक संदर्भात म. निवडणूक निरीक्षक यांनी समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी मनीष गायकवाड, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, प्रदीप पाटील तहसीलदार , सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, उल्हास देवरे तहसीलदार पारोळा, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल बागुल मुख्याधिकारी नगरपरिषद एरंडोल, तसेच निवडणूक निरीक्षक यांचे समन्वय अधिकारी बाविस्कर उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग पारोळा हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत