यंदा गिरणा धरणातून पाच आवर्तने मिळणार रब्बी हंगाम बहरणार.

महत्वाची बातमी महाराष्ट्र शेती
Share

यंदा गिरणा धरणातून पाच आवर्तने मिळणार रब्बी हंगाम बहरणार.
एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील

जळगाव – गतवर्षी दुष्काळामुळे अवघे ५६ टक्के जलसाठा झालेल्या गिरणा धरण यंदा १०० टक्के भरल्याने यंदा शेतीसह पिण्याचे एकूण पाच आवर्तने मिळणार आहेत. त्यामुळे गिरणावर अवलंबून असलेल्या हजारो हेक्टर शेतीला पाणी निळणार असून यंदाचा रब्बी हंगाम बहरणार आहे. ५२ हजार हेक्टर क्षेत्रावरील सिंचनासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या गिरणा धरणात १०० टक्के साठा असून गेल्या दोन महिन्यांपासून सतत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अद्यापही धरणाचा एक दरवाजा ३० सेमीने उघडा असून त्यातून १२३८ क्युसेक
पाण्याचा विसर्ग गिरणा नदीत जात आहे. पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात धरणातील विसर्ग हा थांबविण्यात येत असतो. मात्र नोव्हेंबर महिन्याचे १५ दिवस उलटूनही धरणातून यंदा विसर्ग सुरू आहे.
यंदा नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे १५ सप्टेंबर रोजी १०० टक्के जलसाठा झाला होता. पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरणात केवळ ११ टक्केच जलसाठा होता. सध्यस्थितीत गिरणा धरणात पाणलोट क्षेत्रातून
अजूनही काही प्रमाणात पाण्याची आवक ही सुरुच आहे.
गिरणा धरण शंभर टक्के भरल्यास रब्बी हंगामात चार ते पाच पाण्याचे आवर्तन मिळतात. मात्र निवडणुकांमुळे अद्याप कालवा समितीची बैठक झालेली नाही. दरम्यान, यंदा
गिरणा धरणातील जलसाठा पाहता, नेहमीप्रमाणे चार ते पाच आवर्तनें मिळू शकणार आहेत. गेल्यावर्षी अपुऱ्या जलसाठ्यामुळे धरणातील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले होते. सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे रब्बी हंगामाला फटका बसला होता. यंदा मात्र १०० टक्के ओव्हरफ्लोमुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याची देखील चिंता मिटल्याने समाधान व्यक्त होत आहे. गिरणा धरण निम्म्या जळगाव जिल्ह्याला वओव्हरफ्लोमुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याची देखील चिंता मिटल्याने समाधान व्यक्त होत आहे. गिरणा धरण निम्म्या जळगाव जिल्ह्यालाओव्हरफ्लोमुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याची देखील चिंता मिटल्याने समाधान व्यक्त होत आहे. गिरणा धरण निम्म्या जळगाव जिल्ह्याला वरदान ठरणारेआहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत