गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या लढतीत डॉ.रत्नाकर गुट्टे 26292 मतांनी विजयी

महाराष्ट्र
Share

गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या लढतीत डॉ.रत्नाकर गुट्टे 26292 मतांनी विजयी

गंगाखेड प्रतिनिधी
बाळासाहेब जंगले

विधानसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या लढतीत अखेर डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी सर्व राजकीय पुढाऱ्यांच्या विरोधात एकाकी लढत देत सामान्य नागरिकांना सोबत घेत आपल्या केलेल्या कार्याच्या कर्तबगारी वर विजयश्री खेचून आणला.
गंगाखेड विधानसभा ही आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्या ना कोणत्या कारणाने गाजत असते लक्ष्मीअस्राचा शाप आसलेल्या या मतदार संघात बऱ्याच घडामोडी घडत राहिल्या विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल शनिवारी (ता.२३) घोषित करण्यात आला. यामध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महायुती पुरस्कृत तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार डॉ. रत्नाकर गुट्टे हे विजयी झाले.
मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उबाठाचे उमेदवार विशाल विजयकुमार कदम उभे होते. तर वंचित बहुजन आघाडी कडून माजी आ. सिताराम घनदाट यांनी निवडणूक लढवली. राष्ट्रीय समाज पक्षाकडून आ. डॉ. रत्नाकर गुट्टे हे उभे होते. डॉ. रत्नाकर गुट्टे यांना महायुतीने पाठिंबा जाहीर केला होता. महाविकास आघाडीचे विशाल कदम व रासपाचे डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यामध्ये सरळ लढत होउन शिवसेना (उबाठा) गटाचे विशाल कदम हे दहाव्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. तर डॉ. रत्नाकर गुट्टे हे पिछाडीवर होते. अकराव्या फेरीपासून डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी आघाडी घेतली. तर ही आघाडी ३१ व्या फेरीपर्यंत टिकून राहिली. अंतिमफेरी अखेर डॉ. रत्नाकर गुट्टे यांना १४१५४४ मते मिळाली. तर विशाल कदम यांना ११५२५२ मते पडली. व वंचितचे उमेदवार माजी आमदार सिताराम घनदाट यांना ४३०२६ मतं मिळाली. या निवडणुकीत डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी २६ हजार २५२ मतांनी विजयी मिळवला. विजय घोषित होण्यापूर्वीच डॉ. रत्नाकर गुट्टे यांची शहरातील मुख्य बाजारपेठेतून फटाक्यांच्या आतिशबाजीत, भव्य दिव्य, व जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.गंगाखेड मतदार संघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर सर्व विरोधकांना शह देत एकाकी खिंड लढवत अखेर महाविकास आघाडीचे विशाल कदम यांना हरवत 26 हजार 292 एवढ्या मताची लिड घेत अखेर डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी विजय मिळवला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत