नागपूर येथील भारतीय खाण ब्युरो मुख्यालयात 75 वा संविधान दिन साजरा
नागपूर : – नागपूरच्या सेमिनरी हिल्स भागातील भारतीय खाण ब्युरोच्या (आयबीएम) मुख्यालयात 75 वा संविधान दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती समितीच्या विद्यमाने झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या डॉ. पायल थाओरे, विभाग प्रमुख, पीजीटीडी कायदा, आरटीएमएनयू तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले मुख्य खाण नियंत्रक पी.एन. शर्मा यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.एन. शर्मा, यांनी हिंदीतून उद्देशिकेचे वाचन केले, तर अनिल एच. रामटेके, अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती समिती, आयबीएम यांनी उद्देशिकेचे इंग्रजीत वाचन केले.

प्रमुख पाहुण्या डॉ. थाओरे यांनी आपल्या भाषणात लोकशाहीचे प्रमुख स्तंभ अधोरेखित करत भारतीय राज्यघटनेच्या विविध वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती दिली. पी.एन.शर्मा यांनी लोक आपल्या कर्तव्यांपेक्षा आपल्या हक्कांबद्दल अधिक जागरूक असतात या मुद्दयावर भर देत, मूलभूत अधिकारांचा आदर केला जातो तेव्हाच मूलभूत कर्तव्ये नैसर्गिकरित्या पाळली जातात असे नमूद केले.
O1CL.jpeg)
समितीचे अध्यक्ष ए.एच. रामटेके यांनी स्वागतपर भाषण केले, तर समितीचे सचिव.निलेश महात्मे यांनी सचिवीय अहवाल सादर केला. यावेळी ‘जातीभेद का भीजनाश’ या पुस्तकाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले.
#nagpur #dio #pib #maharastra

