विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेत तपासणी अहवाल वाचन

महत्वाची बातमी
Share

विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेत तपासणी अहवाल वाचन
परभणी – दि. २८ नोव्हेंबर
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील जिल्हा परिषद अंतर्गत विविध विषयांचे अहवाल वाचन बैठकीचे आयोजन छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात आले होते.

यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील उप आयुक्त (आस्थापना) सुरेश बेदमुथा, सहाय्यक आयुक्त (तपासणी) राजेंद्र अहिरे, प्रभारी जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रताप काळे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) ओमप्रकाश यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे यांच्यासह सदर बैठकीस जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी (सर्व) पंचायत समिती, तालुकास्तरीय कार्यालयातील सर्व प्रमुख तसेच जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी तसेच संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त, श्री दिलीप गावडे यांनी विविध विभागांच्या योजनांच्या कामकाजा बाबत तपशीलवार माहिती जाणुन घेऊन त्यावर मार्गदर्शन केले. त्याच बरोबर त्यांनी जिल्हा परिषदेतील कामकाजाची पाहणी देखील केली. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील श्री सुरेश बेदमुथा, उप आयुक्त (आस्थापना) व श्री राजेंद्र अहिरे, सहाय्यक आयुक्त (तपासणी) यांनी सन २०२२-२३ या वर्षातील जिल्हा परिषद तपासणी अहवालातील बाबी निदर्शनास आणुन, अपेक्षीत कार्यवाही बाबत अनुपालना बाबत आवश्यक त्या सूचना दिल्या.

कार्यक्रमाची प्रस्तावना श्री ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) यांनी केली. तसेच सर्व विभाग प्रमुखांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तरे दिली.
चौकट
विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी विविध विकास योजनेची कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण होतील याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत