महायुतीच्या मंत्रिमंडळात गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे मंत्री व्हावेत…

महत्वाची बातमी
Share

महायुतीच्या मंत्रिमंडळात गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे मंत्री व्हावेत…

समर्थकांचे संत जनाबाईंच्या चरणी साकडे : मतदारसंघात उत्सुकता!

गंगाखेड (प्रतिनिधी):-
बाळासाहेब जंगले

महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी शपथ घ्यावी, यासाठी सर्व समर्थक व पदाधिकाऱ्यांनी शहरातील संत जनाबाईं मंदिरात विधिवत पूजन करून जनाबाईंच्या चरणी साकडे घालून महाआरती केली आहे.

गंगाखेड, पालम आणि पूर्णा या तीन तालुक्यात विभागलेल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आ.डॉ.गुट्टे यांनी पहिल्याच टर्ममध्ये आपल्या कामांची चुणूक दाखवून दिली आहे. तब्बल ५ हजार कोटींपेक्षा अधिक निधी आणून गावोगावी विकासाची गंगा पोहोचवली आहे. विशेषत: गेल्या ४० वर्षांचा ब्याकलॉग भरून काढला आहे. त्यामुळे त्यांच्या सारख्या दुरदृष्टी बाळगणाऱ्या लोकप्रतिनिधीला मंत्री केल्यास विकासाला चालना मिळेल, असा विश्वास माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले यांनी व्यक्त केला.

राज्यात यंदा महायुतीने दैदिप्यमान यश मिळवले आहे. परंतु, आमदार डॉ.गुट्टे यांनी अतिशय संकटाच्या काळात भाजपला मोलाची साथ दिली आहे. याची जाणीव माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. सध्या त्याचाच नेतृत्वात सरकार स्थापन होत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आमदार डॉ.गुट्टे यांच्या प्रामाणिकपणाला योग्य तो न्याय मिळेल. तसेच त्यांची मंत्रीपदी वर्णी निश्चित लागेल, असे सूतोवाच उपसभापती संभाजीराव पोले यांनी केले.‌

तर संत जनाबाई हे अवघ्या महाराष्ट्राचे श्रध्दास्थान आहे. हिच्या दरबारातून कोणीही रिकाम्या हाताने जात नाही. त्यामुळे जनाबाईंचा आशीर्वाद पाठीशी असल्याने या मतदारसंघाताचे लाडके व लोकप्रिय लोकप्रतिनिधी आमदार डॉ.गुट्टे हे मंत्रीपदाची माळ घालूनच गंगाखेडला परततील, अशी अपेक्षा सभापती साहेबराव भोसले यांच्यासह सर्व समर्थकांना आहे.‌

दरम्यान, रासप आमदार डॉ.गुट्टे हे फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी वेळोवेळी भाजपला विशेष मदत केली आहे. विधान परिषद आणि राज्य सभेच्या निर्णायक निवडणुकीत महायुतीला विशेषतः भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीची परतफेड मंत्रीपदाने केली जाणार असल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू आहे.‌ परिणामी, आ.डॉ.गुट्टे यांच्या रूपाने‌ मतदारसंघाला पहिला मंत्री मिळेल का? याची मतदारसंघातील नागरिकांना उत्सुकता लागली आहे.‌

यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष किशनराव भोसले, सभापती साहेबराव भोसले, उपसभापती संभाजीराव पोले, विधानसभा अध्यक्ष कृष्णा सोळंके, राजेभाऊ बापू सातपुते, माजी सभापती मुंजाराम मुंडे, माजी पंचायत समिती सदस्य नितीन बडे, राधाकिशन शिंदे, उद्धव शिंदे, संदीपराव राठोड उद्धवराव चोरघडे, युवक तालुकाध्यक्ष बालाजी लटपटे, शेषराव सलगर, प्रभाकरराव जाधव, बालासाहेब भोसले, सुदर्शन भोसले, संतोष पेकम, प्रताप मुंडे यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्ष व मित्रमंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत