लीगल एड क्लीनिक लकडगंज नागपूर दोघांनी केला एकसमाजोता
नागपूर:- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर च्या माध्यमातून लकडगंज पोलीस स्टेशन नागपूर येथे जिल्हा सचिव मा.श्री सचिन पाटील यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या लीगल एड क्लीनिक च्या माध्यमातून (नावं बदललेले ) सौ. मोनाली आणि श्री. प्रदीप यांचा वाद क्लीनिक मध्ये आला होता. या दोघांना लीगल क्लीनिक मध्ये मार्गदर्शन करण्यात आले. त्यानुसार दोघांन मध्ये असलेला वाद होता तो क्लीनिक मध्ये ३ वेळेच्या मार्गदर्शनातून दोघांची मतभेद मिटला आणि सौ. मोनाली आणि श्री. प्रदीप यांचे मध्ये एक समजोता झाला,, प्रदीप मोनालीला पैसे देत नव्हता त्यामुळे तिच्या मुलांचे शिक्षण , घराचा किराया,कसा होईल असा प्रश्न पडला होता मात्र लीगल क्लीनिक मध्ये त्यांनी घराचा सर्व किराया ,लाईट बिल, मेंटनेन्स, सोबत शाळेची 120000/ वार्षिक फी सोबत 30000/- महिना खर्च देण्यास तयार झाला. सोबत 2 बेडरूम चा फ्लॅट घेऊन व्यवस्था जीवनभर करण्याचे लेखी स्वरूपात दिले.
लीगल एड क्लीनिक लकडगंज चे वकील जयश्री हेडाऊ आणि अधिकार मित्र मुकुंद अडेवार यांनी मार्गदर्शन केले व हा वाद येथेच मिटविला.

