भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळासोबत आढावा बैठक संपन्न .

महत्वाची बातमी महाराष्ट्र
Share

भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळासोबत आढावा बैठक संपन्न. .
एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील
राज्यातील प्रत्येक कामगाराचा विकास हा केवळ आर्थिक पातळीवर नाही तर सामाजिक, मानसिक आणि शारीरिक पातळीवरही होण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे कामगारांना आश्वासित करणारे मत व्यक्त करण्यात आले.
मंत्रालयात काल (दि.७ जाने) भारतीय मजदूर संघ, विदर्भ प्रदेश यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेण्यात आली. यावेळी भारतीय मजदूर संघाचे क्षेत्रीय संघटन मंत्री सी. व्ही. राजेश, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड अनिल ढोमणे, विदर्भ प्रदेश मंत्री रवींद्र गणेशे आणि भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सांगण्यात आले की, महाराष्ट्र शासनाचे कामगार विषयक धोरण तयार करण्याबाबत चर्चा करण्यात येईल. तसेच कामगारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार विमा रुग्णालय स्थापन करण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील. असंघटित कामगारांच्या विकासासाठी निधी उभारण्याचे नियोजन असून या निधीच्या माध्यमातून असंघटित कामगारांसाठी विमा, आरोग्य या योजना राबवण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले.
भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींनी यावेळी आपले निवेदन सादर केले असून कामगारांच्या समस्या, त्यांच्या अडचणी, आणि कामगार संघटनांच्या मागण्या, त्यांच्या अंमलबजावणीची स्थिती याबाबत चर्चा करण्यात आली.

#कामगार_मंत्रायल #कामगार #मुंबई #मंत्रालय

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत