चारशे रुपयांची लाच भोवली, वीज वितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला अटक

महाराष्ट्र
Share

चारशे रुपयांची लाच भोवली, वीज वितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला अटक.
एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील .

जळगाव:वीज पुरवठ्याची वायर दुसऱ्या खांबावरून टाकून देण्याच्या मोबदल्यात चारशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शिरपूर येथील वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र वसंतधोबी याला धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. त्याच्या विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे शिरपुर येथील रहिवासी असुन मौजे वरवाडे शिरपुर येथे त्यांचे घराचे बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी तक्रारदार यांच्या घराच्या विज पुरवठयाच्या वायरचा अडथळा येत असल्याने ही वायर दुसऱ्या खांब्यावरुन जोडुन मिळण्याकरीता तक्रारदार यांनी म.रा. वि.वि. कंपनी उपविभाग, शिरपुर कार्यालयात जावुन वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र धोबी यांची भेट घेवुन त्यांना त्यांच्या विज पुरवठयाची वायर दुसऱ्या खांब्यावरुन जोडुन देणेबाबत विनंती केली. यावेळी धोबी यांनी दुसऱ्या खांब्यावरुन वायर जोडुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार
यांच्याकडे ५०० रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी दुरध्वनी व्दारे ला.प्र.विभागाच्या धुळे कार्यालयास माहिती दिली होती. त्यावरुन ला.प्र.वि. धुळे विभागाच्या पथकाने शिरपुर येथे जावुन तक्रारदार यांची तक्रार नोंदवुन या तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र धोबी यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती ४०० रुपये लाचेची मागणी केली. या लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांच्याविरुध्द शिरपुर शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, मकरंद पाटील, प्रविण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.
मौजे वरवाडे शिरपुर येथे घराचे बांधकाम सुरु आहे. याठिकाणी तक्रारदार यांच्या घराच्या विज पुरवठ्यासंदर्भात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे वीज कनेक्शनची वायर एका विजेच्या खांबावरुनदुसऱ्या खांबावरुन जोडून मिळणेकरिता तक्रारदार यांनी वीज कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात जाऊनवरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र धोबी यांची भेट घेतली. त्यांना त्यांच्या विज पुरवठयाची वायर दुसऱ्या खांब्यावरुन जोडुन देणेबाबत विनंती केली. तेव्हा जितेंद्र धोबी यांनी वायर दुसऱ्या खांब्यावरुन जोडुन देण्याच्या मोबदल्यात ५०० रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी यासंदर्भात बुधवारी ८ रोजी दुरध्वनी व्दारे धुळ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयास दुरध्वनीवरुन तक्रार केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत